शिक्षक बँकेचे राजेंद्र घोरपडे अन् सिद्धेश्वर पुस्तके यांना बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 13:50 IST2019-08-23T13:45:43+5:302019-08-23T13:50:19+5:30
सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे आणि राज्य शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांना दहिवडी येथे रात्री बेदम मारहाण केली. ही नेमकी घटना कशामुळे घडली, याचा उलगडा झाला नसला तरी शिक्षक बँक नोकरभरतीच्या अनुषंगाने हा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे.

शिक्षक बँकेचे राजेंद्र घोरपडे अन् सिद्धेश्वर पुस्तके यांना बेदम मारहाण
दहिवडी : सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे आणि राज्य शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांना दहिवडी येथे रात्री बेदम मारहाण केली. ही नेमकी घटना कशामुळे घडली, याचा उलगडा झाला नसला तरी शिक्षक बँक नोकरभरतीच्या अनुषंगाने हा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे.
या दोघांनी घरावर दगडफेक केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे आजूबाजूचे लोक संतप्त झाले आणि त्यांनी नेमके काय झाले, याची विचारणा केली. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीतून संतप्त जमावाने त्यांना पुन्हा मारहाण केली. दरम्यान, यावेळी नगरसेविकेच्या पतीने दोघांना घरात बांधून मारहाण केल्याचेही बोलले जात आहे. या घटनेनंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने दाखल झाले असून, पोलीस ठाण्यासमोर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अद्याप या घटनेची दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.