जिल्ह्यात पाचव्या दिवशीही पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST2021-06-03T04:28:09+5:302021-06-03T04:28:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात पाचव्या दिवशीही मान्सूनपूर्व पाऊस काही ठिकाणी हलक्या स्वरुपात पडला. मात्र, खरीप हंगामातील पेरणीसाठी ...

Rain on the fifth day in the district | जिल्ह्यात पाचव्या दिवशीही पाऊस

जिल्ह्यात पाचव्या दिवशीही पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात पाचव्या दिवशीही मान्सूनपूर्व पाऊस काही ठिकाणी हलक्या स्वरुपात पडला. मात्र, खरीप हंगामातील पेरणीसाठी अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. सध्या जिल्हावासीयांचे मान्सूनचा पाऊस कधी सुरू होतो याकडे लक्ष लागलेले आहे.

जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस होत आहे. सुरुवातीचे चार दिवस अनेक भागात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे ऊन गायब झाले असून दिवसभर ढगाळ वातावरण तयार होत आहे. तसेच कमाल तापमानही ३५ अंशाच्या खाली आले आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांतही आनंदाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. त्यामुळे वेळेत पाऊस सुरू होणे अपेक्षित असते. यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस होत असलातरी अजूनही मोठ्या प्रमाणात झालेला नाही. त्यामुळे सारी भिस्त आता मान्सूनवरच आहे. त्यातच जिल्ह्यात पाच दिवसांपासून पाऊस पडू लागला आहे. बुधवारीही दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या स्वरुपात पाऊस झाला.

.......................................................

Web Title: Rain on the fifth day in the district