काशीळ येथील जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST2021-01-20T04:38:47+5:302021-01-20T04:38:47+5:30

नागठाणे : काशीळ येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून बोरगाव पोलिसांनी दुचाकी, मोबाईल संचासह ४४ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ...

Raid on gambling den at Kashil | काशीळ येथील जुगार अड्ड्यावर छापा

काशीळ येथील जुगार अड्ड्यावर छापा

नागठाणे : काशीळ येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून बोरगाव पोलिसांनी दुचाकी, मोबाईल संचासह ४४ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काशीळ हद्दीतील यशवंत हायस्कूलच्या निकट परिसरातील मोकळ्या जागेत जुगार सुरू होता. याप्रकरणी फिरोज महंमद शेख (वय ५५), अविनाश युवराज कांबळे (४१), हुसेन दिलावर कागदी (३४), सुभाष संपत कोळेकर (४५), चंद्रकांत तात्याबा कोळेकर (५० सर्व रा. काशीळ, ता. सातारा) तसेच राजेंद्र मनोहर सुतार (४१, रा. शिरगाव, ता. कऱ्हाड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दुचाकी (एमएच १२ बीएन ४७५५), मोबाईल संचासह सुमारे ४४ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदरची कारवाई रविवारी रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर सुर्वे, किरण माने, राहुल भोये, पोलीस कॉन्स्टेबल वाघ आणि टोणे यांनी संयुक्तरित्या केली.

Web Title: Raid on gambling den at Kashil