पुण्यातील महिलेचा साताऱ्यात विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:47+5:302021-06-17T04:26:47+5:30

सातारा : पुण्यातील एका महिलेचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जावळी तालुक्यातील ...

Pune woman molested in Satara | पुण्यातील महिलेचा साताऱ्यात विनयभंग

पुण्यातील महिलेचा साताऱ्यात विनयभंग

सातारा : पुण्यातील एका महिलेचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जावळी तालुक्यातील मोरावळे येथील एकावर विनयभंग आणि जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, पीडित महिला ही पुणे येथील एका उपनगरात राहत असून, ती नोकरी करते. तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वैभव अनंत गोळे (रा. मोरावळे, ता. जावळी, जि. सातारा) याने अश्लील फोटो काढले आणि शारीरिक संबंध नाही ठेवलेस तर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याच वेळी वैभव याने त्या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले आणि तिला जातिवाचक शिवीगाळही केली. हा संपूर्ण घटनाक्रम दहा वर्षांच्या कालावधीत शाहूपुरी येथील रांगोळे कॉलनीत घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवार, दि. १५ रोजी रात्री साडेसात वाजता शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वैभव गोळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक तपास सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल या करत आहेत.

Web Title: Pune woman molested in Satara