शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाममंत्री अडकले कोरेगावातील वाहतूक कोंडीत; कंपनीला सूचना देऊनही सुधारणा नाही, काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:54 IST

कोरेगावला रिंगरोडची गरज : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची स्पष्ट भूमिका

कोरेगाव : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता गंभीर वळणावर आला आहे. ऊस वाहतुकीमुळे निर्माण होणारी रहदारी केवळ नागरिकांसाठीच नव्हे तर मंत्र्यांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अकलूजहून साताऱ्याकडे निघाले असताना आझाद चौक, डीके ऑइल मिल परिसरात काही वेळ वाहतूक कोंडीत अडकले. त्यांच्या वाहनांचा ताफा पूर्णतः ठप्प झाल्याने वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली.या घटनेनंतर मंत्री भोसले यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की, ‘होय, मी कोरेगावात वाहतूक कोंडीत अडकलो होतो. कोरेगावातील रस्ता अरुंद असून, तो राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहे. ठेकेदार कंपनीने योग्य पद्धतीने काम केले नाही. वारंवार सूचना देऊनही सुधारणा झालेली नाही, त्यामुळे त्या कंपनीकडून काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.’त्यांनी पुढे सांगितले की, ‘कोरेगाव शहरासाठी रिंगरोड आता काळाची गरज आहे, अपरिहार्यता देखील आहे. गेल्या वर्षी पुसेगाव येथे झालेल्या सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या यात्रेच्या वेळीही मी हा मुद्दा मांडला होता. जर स्थानिक आमदार महेश शिंदे यांनी पुढाकार घेऊन नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांची मानसिकता तयार केली, तर रिंगरोडमुळे कोरेगावची वाहतूक समस्या कायमस्वरूपी मिटू शकेल.’सध्या कोरेगावमधील रस्ता काँक्रीट करण्यात आला असला तरी तो मुळातच लहान आहे. आता तो आणखी रुंद करणे शक्य नाही. भविष्यातील वाढती रहदारी लक्षात घेता रिंगरोड हा एकमेव पर्याय असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.दरम्यान, कोरेगाव शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे केवळ चारच कर्मचारी आहेत. रात्रगस्त, साप्ताहिक सुट्टी व इतर जबाबदाऱ्यांमुळे प्रत्यक्ष रस्त्यावर दोन ते तीन कर्मचारीच ड्युटीवर असतात. सातारा, सांगली व परिसरातील तब्बल बारा साखर कारखान्यांची ऊस वाहतूक कोरेगावातूनच होत असल्याने सुमारे १४० दिवस शहर ठप्प राहते. नागरिक त्रस्त झाले असून, रिंगरोडचा विषय आता केवळ चर्चेपुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवावा, अशी मागणी वाढू लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Minister Stuck in Koregaon Traffic; Road Work Faces Scrutiny

Web Summary : Public Works Minister Shivendrasinhraje Bhosle was caught in Koregaon traffic due to sugarcane transport and poor road work. He's initiating action against the contractor and emphasizes the urgent need for a Koregaon ring road to solve the constant traffic issues, especially with 12 sugar factories using the route.