उंब्रज : एका महाविद्यालयातील युवतीला त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकाने सोशल मीडियावरून अश्लील मेसेज करून शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी संबंधित प्राध्यापकावर उंब्रज पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. १७) सायंकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्राध्यापकाला तत्काळ अटक केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित युवती ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, संशयित आरोपी प्राध्यापक धनाजी तानाजी सावंत (रा. पाप्री, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याने तिला मोबाईलवर अश्लील मेसेज केले. त्याने मेसेज करून शरीर सुखाची मागणी केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने ही घटना कुटुंबीयांना सांगितली.
यानंतर कुटुंबीयांसह युवतीने थेट उंब्रज पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकाराची तत्काळ दखल घेत संशयित आरोपीवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर हे अधिक तपास करत आहेत.
Web Summary : A Satara professor was arrested for sending obscene messages to a student, soliciting sexual favors. The Umbraj police swiftly acted on the complaint, arresting the accused. The incident has sparked outrage in the community.
Web Summary : सतारा में एक प्रोफेसर को छात्रा को अश्लील संदेश भेजने और यौन संबंध मांगने के आरोप में गिरफ्तार किया गया है। उमराज पुलिस ने शिकायत पर तुरंत कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया। इस घटना से समुदाय में आक्रोश है।