शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

जर्मन तरुणांकडून कारागृहातील कर्मचाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:51 IST

सातारा : वाई येथे कुंड्यांमध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सर्गीस व्हिक्‍टर मानका (३१), सेबेस्टीन स्टेन मुलर (२५, ...

सातारा : वाई येथे कुंड्यांमध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सर्गीस व्हिक्‍टर मानका (३१), सेबेस्टीन स्टेन मुलर (२५, दोन्ही रा. जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) या संशयितांनी सातारा जिल्हा कारागृहात विवस्त्र होऊन धिंगाणा घातल्याची घटना घडली. एवढेच नव्हे तर संशयितांनी कारागृहातील खोली क्रमांक ५ मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करीत कारागृह कर्मचारी संदीप फाळके व रमेश ओव्हाळ यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाणही केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, वाई शहरातील नंदनवन कॉलनीतील ‘विष्णू श्री स्मृती’ या बंगल्यात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून बंगल्याच्या तीन बेडरूममध्ये, गॅलरीत, टेरेसवर कुंड्यांमध्ये गांजाची लागवड केल्याने पोलिसांनी २९ किलो गांजा व इतर साहित्य असा आठ लाख २१हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सर्गीस मानका, सेबेस्टीन मुलर या दोन जर्मन नागरिकांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती.

दरम्यान दि.२२ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयितांनी कारागृह कर्मचारी फाळके व ओव्हाळ या दोघांशी उद्धट वर्तन करण्यास सुरुवात केली. संशयितांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून कारागृहातच विवस्त्र होऊन धिंगाणा घातला. हा प्रकार शांत झाल्यानंतर फाळके व ओव्हाळ हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंधरा खोली विभागात गस्त घालत असताना त्यांना पाहून संशयितांनी चिडून जाऊन पंधरा खोली विभागातील ते बंदिस्त असलेल्या खोली क्रमांक ५ मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.