शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाचा भाव..शेतकऱ्यांच्या मोबाईलवर

By admin | Updated: November 1, 2015 00:04 IST

आजपासून प्रारंभ : सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचा आधुनिक उपक्रम; घरबसल्या मिळणार संपूर्ण माहिती

सातारा : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांची आर्थिक फसवणूक थांबविण्यासाठी सातारा शेती उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता रोजच्या रोज ‘एसएमएस’द्वारे बाजारभाव समजल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे. सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे छ. शाहू फळे व भाजीपाला मार्केट येथे तालुक्यातून, जिल्ह्यातून तसेच आसपासच्या राज्यातून कांदा, बटाटा, लसून, आले, फळे तसेच इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. या सर्व शेतमालाची विक्री दररोज लिलावपद्धतीने होते. त्यामुळे बाजारभाव रोजचे रोज निघतात. बाजारभाव शेतकऱ्यांना त्वरित समजावे म्हणून सातारा बाजार समितीद्वारे १ नोव्हेंबर पासून शेतमालाचे बाजारभावाचे ‘एसएमएस’ संबंधित शेतकऱ्याला पाठविण्याची मोफत सुविधा चालू करणार आहे. ग्रामीण भागातून आपला शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येताना शेतमालाचा दर काय आहे, हे माहीत नसते, किंवा काही कंपन्या, व्यापारी शेतकऱ्यांकडून बांधावरूनच मालाची खरेदी करून माल घेऊन जातात. अशावेळी संबंधित शेतकऱ्याला बाजारभावाचे ज्ञान नसल्याने या बाजारभावाच ‘एसएमएस’मुळे त्याला रोजचे बाजारभाव कळे जातील, परिणामी त्याची फसवणूक होणार नाही. ‘छ. शाहू मार्केटमध्ये रात्री उशिरा शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याला मार्केटमध्ये शेतकरी निवासमध्ये मुक्कामाची व्यवस्था केली जाणार आहे. बाजार समितीला खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समिती मार्फत शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम करणार आहे,’असे प्रतिपादन उपसभापती बाबासाहेब घोरपडे यांनी केले. (प्रतिनिधी)  

शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक द्यावेत.. सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने मोफत ‘एसएमएस’ सुविधेबाबत सर्व शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी समिती प्रयत्नशील आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळणार आहे. मात्र, ज्या काही शेतकऱ्यांपर्यंत समितीला प्रत्यक्षपणे पोहोचता आले नाही, अशा शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधून नाव, गाव व मोबाईल नंबर द्यावा,’ असे आवाहन सभापती विक्रम पवार यांनी केले आहे.  

जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. कष्ट करून पिकविलेले शेती उत्पन्न कित्येकदा कवडीमोल दरात विकले जाते. ही बाब लक्षात घेऊन आम्ही ‘एसएमएस’ सुविधा सुरू करत आहे. -अ‍ॅड. विक्रम पवार, चेअरमन शेती उत्पन्न बाजार समिती, सातारा