शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मायणी परिसरामध्ये पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST

मायणी : मायणीसह परिसरात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या मध्यम व ...

मायणी : मायणीसह परिसरात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या मध्यम व हलक्या पावसाच्या सरी पेरणीसाठी व पिकांसाठी पोषक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. त्यामुळे पेरणी केलेले शेतकरी व पूर्ण पावसावर अवलंबून शेती करणारे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले होते, तर पावसाने उघडीप दिलेल्या काळामध्ये शेतकऱ्यांनी बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरणीही उरकून घेतली होती.

धोंडेवाडी, सूर्याचीवाडी, कलेढोण, पाचवड, विखळे व मायणी परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास सर्वत्र पावसाच्या मध्यम ते हलक्‍या सरी पडल्या. पावसाच्या हलक्‍या ते मध्यम सरी झाल्याने रस्त्याच्या कडेला व सखल भागांमध्ये पाणीसाठा निर्माण झाला तर या पावसाने शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भुईंजलाही झोडपले

वाई तालुक्यातील भुईंज, पाचवड परिसरातही सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास तासभर झोडपून काढले. यामुळे पुणे-बंगळोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू होती. मात्र काही किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर पाऊस गायब झालेला वाहनचालकांना अनुभवास मिळत होते. दुचाकीस्वारांचे मात्र हाल झाले. काही जणांनी सेवा रस्त्यावरील झाडाखाली, भुयारी मार्गात थांबणे पसंत केले.