शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तांतराची लाट !

By admin | Updated: August 6, 2015 23:07 IST

ग्रामपंचायत निवडणूक : माणमध्ये शेखर गोरेंची मुसंडी, फलटणमध्ये ६८ ठिकाणी राजे गटाचा दावा तर पाटणमध्ये शंभूराज गटाची बाजी

सातारा : जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापितांना जबरदस्त ‘दे धक्का’ देत सत्तांतराची लाट उसळल्याचे चित्र मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. १00 पेक्षाही जास्त गावांमध्ये परिवर्तन झाले आहे. माण तालुक्यात शेखर गोरे गटाने जोरदार मुसंडी मारली असून, फलटण तालुक्यातही राजे गटाने नेत्रदीपक यश मिळविले आहे. कऱ्हाड, खंडाळा, पाटण अन् कोरेगाव तालुक्यांतील काही मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागल्याने तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.७११ ग्रामपंचायतींपैकी १६१ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले होते. मात्र, उर्वरित ५४७ ग्रामपंचायतींमध्ये काँटे की टक्कर झाली. प्रस्थापितांनी जुन्याच भिडूंना सोबत घेऊन उभ्या केलेल्या पॅनेलची इमारत अनेक ठिकाणी कोसळल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना घरी बसविले आहे. वाई तालुक्यातील बावधन ग्रामपंचायतीत सत्ता राखण्यामध्ये आमदार गटाला यश आले. उडतारे ग्रामपंचायतीमध्ये काँगे्रसने ५ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या. मात्र, आमदार मकरंद पाटील यांच्या गटाने आधीच दोन जागा बिनविरोध केल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता राखली.माण तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींपैकी शेखर गोरे गटाने २६ ग्रामपंचायतींमध्ये जोरदार मुसंडी मारली. आ. जयकुमार गोरे गटाकडे १९ ग्रामपंचायती राहिल्या. खटाव तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्येही शेखर गोरेंच्या गटाने शिरकाव केला आहे. खटाव तालुक्यातील पुसेगाव, निमसोड, धोंडेवाडी, कातरखटाव या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख यांच्या विचारांच्या गटाची सत्ता आली. सातारा तालुक्यात बोरगाव, शेंद्रे, डोळेगाव, परळी, संभाजीनगर या मोठ्या ग्रामपंचायतींमध्येही परिवर्तन घडून आले. यापैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्या गटाने बाजी मारली आहे. इतर गावांमध्ये आ. भोसले व खा. उदयनराजे भोसले यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी परिवर्तन घडवून आणले. फलटण तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींवर राजे गटाने बाजी मारली, तर विरोधी काँगे्रसच्या गटाकडे १८ ग्रामपंचायती उरल्या आहेत. काँगे्रसचे प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील साखरवाडी ग्रामपंचायत रामराजे गटाने आपल्याकडे खेचून आणली.