शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कुसूर विभागात दारूविक्री फोफावली

By admin | Updated: July 21, 2014 23:08 IST

ंदारूचे बॉक्स घरपोच : माल देण्या-घेण्यावरून वाद

कुसूर : कऱ्हाड - ढेबेवाडी मार्गावरील प्रत्येक बसथांब्यावर सध्या अवैध दारूविक्री बोकाळली आहे़ या किरकोळ दारू विक्रेत्यांचे दारूची बॉक्स पोहोचविणाऱ्या बड्या विक्रेत्यांमध्ये माल देण्या-घेण्यावरून दररोज वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील प्रत्येक गावात अवैधरीत्या दारूविक्री फोफावत आहे़ मनमानी पैशात दारूच्या बाटल्यांची विक्री होत असल्याने बक्कळ पैशाच्या हव्यासापोटी किरकोळ विक्रेत्यांची येथे दिवसेंदिवस वाढ होत आहे़ या विक्रेत्यांना व्हाईट कॉलरवाल्यांचा वरदहस्त असल्यामुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस प्रतिष्ठेचा बनत आहे़ या विक्रेत्यांना कोणाचीच भीती नसल्याचे दिसून येते़ तंबाखू-गुटख्याप्रमाणे दारूची राजरोस विक्री होत आहे़ मुळातच हा धंदा अवैध असल्यामुळे मनमानी पैसे घेतले तरी तक्रार कोणाकडे आणि कशी करावी, या विवंचनेत मद्यपी गप्प बसणे पसंत करत आहेत़ त्यामुळे मालामाल झालेल्या विक्रेत्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही़ किरकोळ दारू विक्रेत्यांना घरपोच सेवा देणाऱ्या बड्या विक्रेत्यांचीही संख्या कमी होत नाही. आलिशान गाड्यांमधून वाहतूक करून दारूचे बॉक्स विक्रेत्यांना घरपोच दिले जात आहेत़ एका बॉक्स मागे २०० ते २५० रुपये मिळत असल्याने या विक्रेत्यांमध्येही वाढ होत आहे़ परिणामी बड्या विक्रेत्यांनी या किरकोळ विक्रेत्यांची विभागवार वाटणीच करून घेतल्याचे दिसते़ काही विके्रते कमी पैशाचे आमिष दाखवून किरकोळ विक्रेत्यांना आकर्षित करत आहेत. याचे वादात रूपांतर होत असून, वादाचे प्रकार नित्याचे बनले आहेत़ (वार्ताहर)