शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
4
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
5
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
6
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
7
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
8
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
9
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
10
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
11
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
12
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
13
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
14
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
15
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
17
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
18
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
20
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण कराल तर उचलबांगडी ! : शिवतारे

By admin | Updated: January 13, 2015 00:49 IST

जिल्हा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिला इशारा

सातारा : ‘सातारा जिल्हा हा ठरावीक पक्षाचा बालेकिल्ला आहे, असे समजून त्याच्या नावावर लोकांची अडवणूक केली तर खपवून घेणार नाही. सरकारी अधिकाऱ्यांचा प्रामाणिकपणा हा जनतेच्या कामांसाठी दिसू द्या. कामे न करणाऱ्या, कामात राजकारण आणणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करेन,’ असा गर्भित इशारा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिला.
येथील जिल्हा नियोजन भवनात आज, सोमवारी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी अश्विन मुद््गल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी आमदार दगडू सकपाळ, शिवसेनेचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले, ‘स्थानिक आमदारांच्या दबावाखाली काम करण्याची गरज नाही. आरोप होतील. काम करणाराच चुकतो. सातारचा सर्वांगीण विकास हे धोरण घेऊन आमचे शासन कामाला लागले आहे. यात अकारण राजकारण आणण्याची गरज नाही. विरोधी पक्षातील आमदारांना सोबत घेऊन आम्ही कामे करणार आहोत. मात्र, एखादा आमदार सांगतो आहे म्हणून त्याचंच ऐकायचं, चुकीचं काही तरी रेटायचं, हे आता खपवून घेणार नाही. गेल्या १५ वर्षांत येथील अधिकाऱ्यांना ‘त्यांच्या’ सवयी झाल्या असतील तर त्या आता (पान ९ वर)

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची पाठ
पालकमंत्री विजय शिवतारे यांनी साताऱ्यात घेतलेली ही पहिलीच आढावा बैठक होती. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाच आणि काँग्रेसचे दोन आमदार असून, विधान परिषदेचा एक आमदारही राष्ट्रवादीचा आहे.
यापैकी एकही आमदार या बैठकीस उपस्थित नव्हता. शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची मात्र प्रचंड उपस्थिती यावेळी होती. असे चित्र एरवी दिसत नाही.


जिहे-कटापूर पूर्ण करणार
‘जिल्ह्यातील दुष्काळ संपविण्यावर आपला भर राहणार आहे. जिहे-कटापूर योजना अनेक वर्षांपासून रखडली आहे. या योजनेचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करून नेर तलावात पाणी नेणार आहे,’ अशी गर्जनाही शिवतारे यांनी केली.
‘जिल्ह्यात नदीची वाळू चोरणाऱ्या माफियांची गय करणार नाही. त्यांना हिसका दाखवू,’ असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाधिकाऱ्यांबरोबर
गोपनीय बैठक
पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सत्कार सोहळा संपल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा सर्किट हाउसमध्ये जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यासोबत बंद दरवाज्याआड अर्धा तास गोपनीय बैठक घेतली.
यावेळी सर्व राजकीय पदाधिकारी व इतर अधिकारी यांना बाहेरच ताटकळत ठेवण्यात आले होते. या बैठकीत जिल्ह्याच्या राजकीय पार्श्वभूमीवरील भविष्यातील कामांची चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.