वडुथ, पाटखळ येथे जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 16:29 IST2022-04-19T16:29:05+5:302022-04-19T16:29:29+5:30

त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली

Police raided a gambling den at Vaduth, Patkhal and arrested the two | वडुथ, पाटखळ येथे जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

वडुथ, पाटखळ येथे जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

सातारा : सातारा तालुक्यातील वडुथ आणि पाटखळ गावच्या हद्दीत दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सातारा तालुका पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून १,२०० रुपयांचे जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.

किरण तुकाराम जाधव (वय ३६, रा.वडुथ, ता.सातारा), मनोज राजेंद्र गुप्ते (वय २६, रा.रांगोळी काॅलनी शाहुपुरी, सातारा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. वडुथ गावच्या हद्दीतील एका पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे जुगार खेळताना किरण जाधव हा आढळून आला, तर पाटखळ माथा गावच्या हद्दीत एका घराच्या पाठीमागे आडोशाला जुगार खेळताना मनोज गुप्ते हा आढळून आला. या दोघांनाही पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे.

Web Title: Police raided a gambling den at Vaduth, Patkhal and arrested the two