शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मदत केंद्र पोलिसांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 21, 2014 00:27 IST

आदर्की फाटा : धोकादायक प्रवासाने प्रवासी त्रस्त

पिंपोडे बुद्रुक : सातारा-पुणे राज्य महामार्गावर वाठार स्टेशनजवळ आदर्की फाट्यावर पोलीस मदत केंद्र आहे. सध्या या मदत केंद्राला कुलूप लावल्याने हे मदत केंद्रच पोलिसांच्या प्रतीक्षेत आहे.वाठार स्टेशन, तडवळे सं. वाघोली, ता. कोरेगावच्या हद्दीतून सातारा-लोणंद-नीरा मार्गे पुणे हा राज्य महामार्ग जातो. स्पर्धेच्या युगात रस्त्यावरील वाढते दळणवळण आणि नित्याच्या वाहतुकीमुळे अनेक समस्या सतत निर्माण होत असतात. या महामार्गावर आदर्की फाटा येथे १९९९ मध्ये पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. तत्कालीन पोलीस अधीक्षक मीरा बोरवणकर यांच्या हस्ते या मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.आदर्की फाट्यावरून पुढे सालपे घाट लागतो. त्यामुळे निर्मनुष्य घाट रस्ता आणि तेथून अलीकडे वाठार स्टेशनपर्यंतचा हा रस्ता चोऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारास एकटे गाठून तसेच विरळ वाहतुकीचा गैरफायदा होऊन एखाद्या चारचाकी वाहनास अडवून प्रवाशांना लुटल्याचे व गंभीर मारहाण झाल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. यामुळे सालपे घाट ते आदर्की फाटा हा ‘डेंजर झोन‘ म्हणून प्रवाशांमध्ये प्रसिद्ध आहे. सद्य:स्थितीत आदर्की फाट्यावर हॉटेल्स, ढाबे, परमीट रूम यांची रेलचेल झाली आहे. त्याचबरोबर राज्याबरोबरच परराज्यातूनही होणारी अवजड वाहतूकही या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हे अवजड ट्रक, कंटेनर ढाब्यावर रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी थांबून सकाळी पुढील प्रवासासाठी निघून जात असतात. त्याचबरोबर समाजात फोफावलेली ढाबासंस्कृती आणि चंगळवादामुळे परिसरातील लोकांची विशेषत: तरुणांची रात्री या ठिकाणी गर्दी होत असते. साहजिकच तळीरामांमुळेही या ठिकाणचे वातावरण तणावग्रस्तच असते. गेल्या कित्येक दिवसांपासून याठिकाणी असलेल्या पोलीस मदत केंद्रास कुलूप लावण्यात आलेले आहे. काही अपवादात्मक परिस्थिती याठिकाणी नाकाबंदी केली जाते. अथवा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो, मात्र याठिकाणी कायमस्वरुपी पोलीस असणे गरजेचे आहे. रात्री-अपरात्री अपघात झाल्यास अपघातग्रस्त लोकांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आणि परिसरात छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाणही असल्यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी असावेत, अशी मागणी प्रवासी, ट्रकचालक यांच्यामधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)