शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या सभेत पोलीस बनले हेडमास्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:37 IST

सातारा : सांगली येथील शिक्षक बँकेच्या सभेत गुरुजनांनी जोधुडघूस घातला तसा साताऱ्यातील सभेत दंगा होऊ नये म्हणून सभेची सूत्रे पोलिसांनी हाती घेतल्याचे दिसून आले. गोंधळ घालणाºया गुरुजनांना अखेर पोलिसांनाच शांत करावे लागले. एकंदरीत या सभेत पोलीस हेडमास्टर बनले असले तरी सभा संपेपर्यंत गुरुजनांनी केलेला केवळ गोंधळ अन् गोंधळच अनुभवयास आला.प्राथमिक ...

सातारा : सांगली येथील शिक्षक बँकेच्या सभेत गुरुजनांनी जोधुडघूस घातला तसा साताऱ्यातील सभेत दंगा होऊ नये म्हणून सभेची सूत्रे पोलिसांनी हाती घेतल्याचे दिसून आले. गोंधळ घालणाºया गुरुजनांना अखेर पोलिसांनाच शांत करावे लागले. एकंदरीत या सभेत पोलीस हेडमास्टर बनले असले तरी सभा संपेपर्यंत गुरुजनांनी केलेला केवळ गोंधळ अन् गोंधळच अनुभवयास आला.प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ७१ वी वार्षिक सभा साताºयातील पुष्कर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार शेट्टे यांनी विषय वाचनाला सुरुवात केली. पहिला विषय वाचल्यानंतर शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे हे बोलण्यास उभे राहिले. ‘आम्हाला मान्य नाही. पहिले व्याजदर कमी करा,’ अशी त्यांनी मागणीकरताच समितीचे इतर सदस्यही आपल्या जागेवरून उठले. त्यानंतर प्रचंड गोंधळास सुरुवात झाली. चेअरमन राजेंद्र घोरपडे हे ‘खाली बसा, खाली बसा,’ अशी विनंती करून थकले.‘एवढी थकबाकी कोणाची, ४० लाखांचे कर्ज कोणाला दिले?, रिबेट योजना नक्की काय? असे घोषवाक्य लिहिलेले फलक समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात उंचावून धरत सत्ताधाºयांचा निषेध नोंदविण्यास सुरुवात केली. ‘समितीचा विजय असो, संघाचा मुर्दाबाद’ अशा घोषणा सुरू झाल्या. त्यामुळे व्यासपीठावरून कोण काय बोलत आहे, कोणालाही समजत नव्हतं. संपूर्ण कार्यालयात केवळ गोंधळ अन् गोंधळच ऐकायला येत होता.बँकेचे चेअरमन घोरपडे व माजी व्हाईस चेअरमन मोहन निकम हे वारंवार सभासदांना खाली बसा, तुमच्या प्रश्नांना उत्तर दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही, असे सांगत होते. परंतु गोंधळ थांबता थांबत नव्हता. व्यासपीठावरील संचालकांनी विषय वाचनाबरोबरच ठराव मांडण्यास सुरुवात केली. ठराव मांडताच संघाचे सभासद मंजूरचा नारा देत होते. तर समितीचे सभासद नामंजूरचा नारा देत होते.सभेची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच चेअरमन घोरपडे यांनी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना विनंती करताच त्यांनी माईक हातात घेतला. सारंगकर म्हणाले, ‘गुरुजन हो.. तुम्हाला प्रश्न विचारण्याकरिता माईक हातात दिला जाईल; पण तुम्ही खाली बसून घ्या, गोंधळ घालू नका,’ अशी विनंती केली. तेव्हा समितीचे कार्यकर्ते खाली बसले.व्यासपीठावर चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी चिठ्ठीवर आलेले प्रश्न वाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा शिक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. समितीच्या सभासदांची घोषणाबाजी सुरू असतानाच उपाध्यक्ष महेंद्र अवघडे यांनी सभा संपल्याचे जाहीर करत वंदे मातरम्ला सुरुवात केली. केवळ अर्ध्या तासात सभा गोंधळातच पार पडली.जेवतानाही शूटिंग...शिक्षक सभा प्रचंड गोंधळताच पार पडली. या सभेचे पोलिसांसह बँकेच्या सत्ताधाºयांनीही व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. एवढेच नव्हे तर सभा संपल्यानंतर जेवणासाठी कोण कोण आले आहे, याची माहिती असावी म्हणून जेवणारांचेही व्हिडीओ शूटींग करण्यात आल्याचे दिसून आले.व्यासपीठाला बांबूचे बॅरिकेट्स..यापूर्वी झालेल्या शिक्षक बँकेच्या सभेत खुर्च्या फेकून हाणामारी झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या होत्या. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या सभेला प्रचंड खबरदारी घेण्यात आली होती. व्यासपीठावर कोणी येऊ नये म्हणून समोरून बांबूचे बॅरिकेट्स लावण्यात आले होते. व्यासपीठ आणि शिक्षक सदस्य यांच्यात सात फुटांचे अंतर ठेवण्यात आले होते. बसण्यासाठी कोणालाही खुर्ची दिली गेली नाही. सतरंजीवर सर्वजण बैठक मांडून बसले होते.