शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कचऱ्यातून इंधन निर्मिती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:18 IST

सचिन काकडे । सातारा : प्लास्टिक कचºयाची कोंडी फोडण्यासाठी सातारा पालिकेने एक पाऊल पुढे टाकले असून, सोनगाव टेपोत बेलिंग ...

सचिन काकडे ।सातारा : प्लास्टिक कचºयाची कोंडी फोडण्यासाठी सातारा पालिकेने एक पाऊल पुढे टाकले असून, सोनगाव टेपोत बेलिंग मशीन बसविण्यात आली आहे. या मशिनीद्वारे संकलित होणारा प्लास्टिक कचरा शासनाने नियुक्त केलेल्या विक्रेत्यांना दिला जाणार असून, तो सिमेंट फॅक्टरी व इंधन निर्मितीसाठी उपयोगात आणला जाणार आहे.घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेल्या निरुपयोगी वस्तूंचा साठा. या कचºयाची विल्हेवाट लावणं ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. हा कचरा जाळल्यास त्यातून होणाºया उत्सर्जनामुळे मोठा धोका निर्माण होतो. ही बाब पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत आहे. हा धोका ओळखून सातारा पालिकेकडून घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला आहे.सोनगाव कचरा डेपोत तब्बल ६० गुंठे क्षेत्रात प्रकल्पाचे प्रोसेसिंग शेड उभारण्यात आले आहे. या व्यतिरिक्त वे ब्रीज, सर्व्हिसिंग सेंटर, स्टोअर रूम व स्टाफ रूमचे बांधकामही पूर्ण झाले आहे. सुमारे ४० टनी वजनकाटा या ठिकाणी बसविण्यात आला आहे. या डेपोत दररोज ६० ते ७० टन ओला व सुका कचरा संकलित होतो. यामध्ये सुमारे ४०० ते ५०० किलो प्लास्टिकचा समावेश आहे. या कचºयापासून कायमस्वरुपी सुटका मिळावी, यासाठी सातारा पालिकेने डेपोत बेलिंग मशीन बसविली आहे.डेपोत संकलित होणाºया कचºयातून सर्वप्रथम प्लास्टिक कचरा वेगळा केला जातो. यानंतर हा कचरा बेलिंग मशीनमध्ये टाकला जातो. कचºयावर दाब देऊन त्याचे २५ ते ५० किलो वजनाचे गठ्ठे तयार केले जातात. हा कचरा शासनाने नियुक्त केलेल्या विक्रेत्यांना दिला जाणार असून, त्याचा उपयोग पुढे इंधन, डांबर निर्मितीसाठी केला जाणार आहे. भविष्यात प्लास्टिकचा पुनर्वापर करून लघु प्रकल्प उभारण्याचा पालिकेचा मनोदय आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. हा प्रकल्प स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.अनेक वर्षांपासूनची धुराची समस्याही संपुष्टातसोनगाव डेपोत प्लास्टिक कचरा पेटण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.उन्हाळ्यात धुराचे लोट पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत पसरतात.सोनगाव, शेंद्र्रे, जकातवाडी, डबेवाडी, शहापूर यासह दहा ते पंधरा गावांना याचा त्रास सहन करावा लागतो.प्लास्टिक कचºयाचा प्रश्न मार्गीलागल्याने आता ग्रामस्थांची धुरापासून सुटका होणार आहे.ओल्या कचºयातून निघणाºया सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्थाही डेपोत करण्यात आली आहे.