शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेड सेपरेटरमधून येतोय मुंबई, पुण्याचा फिल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळी ग्रेड सेपरेटरचे अचानक उद्घाटन करून सातारकरांना सुखद धक्का ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळी ग्रेड सेपरेटरचे अचानक उद्घाटन करून सातारकरांना सुखद धक्का दिला. ग्रेड सेपरेटर खुला झाल्याचे समजताच सातारकरांनी काहीही काम नसताना केवळ कुतूहल म्हणून पहिल्या दिवशी भुयारी मार्गातून रपेट मारली. यामधून प्रवास करताना मुंबई आणि पुण्यात असल्यासारखा फिल येत असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.

सातारा शहर हे जिल्ह्याचे नाक म्हणून समजले जाते. या शहरात पहिल्यांदाच पुणे, मुंबईच्या धर्तीवर ग्रेड सेपरेटरचे काम गत चार वर्षांपासून सुरू होते. गत तीन महिन्यांपासून ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास नेण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने ग्रेड सेपरेटरमधून कोणी प्रवास करू नये म्हणून भुयारी मार्गाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. भुयारी मार्ग नेमका कसा बांधण्यात आलाय, हे पाहण्यासाठी सातारकरांना उत्सुकता लागली होती. त्यातच शुक्रवारी सकाळी ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला झाल्याचे समजताच विशेषत: युवक वर्ग भुयारी मार्गातून दुचाकीवरून रपेट मारू लागला. अचानक भुयारी मार्गामध्ये वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. आनंदाच्या भरात युवक शिट्‌या वाजवणे, किंकाळणे, असे प्रकार करू लागले. काहीजण तर भुयारी मार्गातून इकडून-तिकडे फिरू लागले. चालत्या दुचाकीवर उत्साहाच्या भरात युवक सेल्फीही काढत होते. ग्रेड सेपरेटर न्याहाळत, आपण पुणे, मुंबईत तर नाही ना, असेही युवक एकमेकांसोबत बोलत होते. ग्रेड सेपरेटर खुला झाल्याने सातारकरांच्या आनंदाला पारावर उरला नाही. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण केवळ ग्रेड सेपरेटर पाहण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडले. यातून पोलीसही सुटले नाहीत.

ग्रेड सेपरेटरच्या निमित्ताने साताऱ्याच्या वैभवात आणखीनच भर पडलीय. परिणामी पोवई नाक्यावर आता वाहतूक कोंडीही कायमची दूर होणार आहे. त्यामुळे पोलिसांचे कामही हलके झाले आहे.

चौकट :

अन् घोषणांनी परिसर दणाणला!

खास करून ग्रेड सेपरेटर पाहण्यासाठी ग्रामीण भागातूनही युवक साताऱ्यात आले होते. या युवकांनी भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहून फोटोसेशनही केले. ग्रेड सेपरेटरमधून दुचाकीवरून तीन ते चार रपेट मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा युवकांनी दिल्या. या घोषणांनी परिसर अक्षरश: दणाणून गेला.

फोटो : जावेद खान