Satara: फलटण पालिका कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावली, दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:52 IST2026-03-04T16:52:18+5:302026-03-04T16:52:52+5:30

फलटण : पद्मावतीनगर, ता. फलटण येथे करवसुलीसाठी गेलेले कर अधिकारी राजेश भीमराव काळे (वय ५७) व पालिका कर्मचारी हजरत ...

Phaltan Municipality employee beaten up, case registered against two | Satara: फलटण पालिका कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावली, दोघांवर गुन्हा दाखल

Satara: फलटण पालिका कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावली, दोघांवर गुन्हा दाखल

फलटण : पद्मावतीनगर, ता. फलटण येथे करवसुलीसाठी गेलेले कर अधिकारी राजेश भीमराव काळे (वय ५७) व पालिका कर्मचारी हजरत कोतवाल यांना शिवीगाळ करून एका कर्मचाऱ्याच्या थेट कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी मीनाक्षी भीमराव मोटे व सौरभ भगवानराव मोटे (दोन्ही रा. पद्मावती नगर, ता. फलटण) यांच्या विरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, रविवारी दि. ०१ मार्च २०२६ रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास पालिकेचे कर अधिकारी, वसुली लिपिक आणि शिपायांचे एक पथक पद्मावतीनगर येथे करवसुलीसाठी गेले होते. एका थकबाकीदार महिलेची घरपट्टी अनेक वर्षांपासून थकीत असल्याने पथकाने त्यांना कर भरणा करण्यास सांगितले. त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

संबंधित नागरिक थकीत बिल भरत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, नगरपालिकेच्या पथकातील एका कर्मचाऱ्याने त्यांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईचा राग आल्याने संबंधित महिला आणि घरातील एका तरुणाने कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात अपशब्द वापरत शिवीगाळ व दमदाटी केली.

नागरिकांकडून सुरू असलेला हा प्रकार पथकातील एक शिपाई आपल्या मोबाइलमध्ये चित्रित करत होता. हे पाहताच संबंधित महिलेने थेट त्या शिपायाच्या अंगावर धावून जाऊन त्याच्या गालावर जोरात चापट मारली आणि त्याच्या हातातील मोबाइल खाली पाडला. याप्रकरणी दाेघांवर फलटण शहर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title : सतारा: फलटण पालिका कर्मचारी को थप्पड़, दो पर मामला दर्ज।

Web Summary : फलटण: कर वसूली के दौरान नगरपालिका कर्मचारी पर हमला, दो पर मामला दर्ज। बकाया संपत्ति कर को लेकर विवाद के बाद कर्मचारी द्वारा पानी का कनेक्शन काटने पर घटना हुई।

Web Title : Satara: Faltaan Municipality worker slapped; Case filed against two.

Web Summary : Falton: Two booked for assaulting a municipality worker during tax collection. The incident occurred after a dispute over unpaid property taxes led to the worker initiating disconnection of water connection.