Phaltan Doctor Death: प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:01 IST2025-10-30T14:00:59+5:302025-10-30T14:01:56+5:30
Phaltan Doctor Death: पीडित महिला डॉक्टराच्या मृत्यूप्रकरणी प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ बदने हे दोघे पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्या तपासातून व चौकशीतून अनेक खुलासे समोर येत आहेत.

Phaltan Doctor Death: प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. महिला डॉक्टर आणि आरोपी प्रशांत बनकर यांच्यात प्रेमसंबंध होते. त्या दोघांचा ब्रेकअपही झाला होता. पण प्रशांत आजारी पडल्याने त्यांच्यात पुन्हा जवळीक निर्माण झाली. या काळात पीडिता डॉक्टर युवतीने प्रशांतला लग्नासाठी विचारले होते. प्रशांतने लग्नाला नकार दिल्याने तिनं आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसा मेसेज करत तिने जीवन संपविल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
पीडित महिला डॉक्टराच्या मृत्यूप्रकरणी प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ बदने हे दोघे पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्या तपासातून व चौकशीतून अनेक खुलासे समोर येत आहेत. महिला डॉक्टर व प्रशांत बनकर यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये १५७ पेक्षा जास्त वेळा कॉल झाल्याचे आढळूले आहे. तसेच व्हॉट्सअॅप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहे.
पीडिता व प्रशांत बनकर यांच्यात फोन चॅट्स आहेत. ज्या रात्री आत्महत्या केली. त्या रात्री पीडितेने हॉटेलचे फोटो पाठवून 'मी आत्महत्या करेन' असा संदेशही पाठवला होता, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली असली तरी या प्रकरणात मी स्वतः तपासी अधिकारी असल्याने मला माहिती देता मला माहिती देता येणार नाही.
विशाल खांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी, फलटण
दोघांमध्ये झाला वाद...
घटने दिवशी दोघांमध्ये फोटो काढण्यावरून वाद झाला होता. यावेळी ती घराशेजारी असणाऱ्या मंदिरात निघून गेली. प्रशांतच्या कुटुंबियांनी तिची समजूत काढल्याचेही बोलले जाते. याच दिवशी ती रात्री दीड वाजता हॉटेलवर पोहचली. तिथून तिने प्रशांतला अनेक फोन केल्याचे समोर येत आहे. याच वेळी 'मी आत्महत्या करेन' असे मेसेजही महिला डॉक्टरने बनकर याला केल्याचे तपासातून पुढे आले आहे.
प्रशांत बनकर याने लग्नाला नकार दिल्याने तिने जीवन संपविल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. तर दोघांमध्ये आत्महत्येच्या रात्रीही चॅटिंग झाल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही फलटण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.