शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरची लोकवस्ती रोगराईच्या विळख्यात

By admin | Updated: September 25, 2014 23:23 IST

पालिकेचे दुर्लक्ष : उपाययोजना आखण्याची नागरिकांची मागणी

महाबळेश्वर : रामगड येथील शिवसमर्थ गृहनिर्माण सोसायटीत नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयांमुळे स्थानिक लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पालिकेच्या मालकीचा सर्व्हे क्रमांक १५३/३ या मिळकतीत गेल्या २० वर्षांपासून नगरपालिकेची सार्वजनिक शौचालये आहेत. दोन वर्षांपूर्वी नगरपालिकेच्या वतीने जुनी शौचालये पाडून नवीन २४ शौचालये असलेली इमारत बांधण्यात आली. या जागेत ही इमारत ऐन लोकवस्तीमध्ये असून, मैला साठवणूक करून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी जमिनी खाली टाकी न बांधता शौचालयांचा मैला काही अंतरावरच असणाऱ्या उघड्या गटारात सोडलेला आहे. या नजीकच शिवसमर्थ गृहनिर्माण सोसायटी आहे. गेली कित्येक वर्षे येथील नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे. या सदंर्भात वस्तीतील लोकांनी नगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या. मात्र, कोणताही पाठपुरावा झाला नाही. कारवाईबाबत विचारणा केली असता याच वस्तीतील एक रहिवासी व्यक्ती या ठिकाणी बंदिस्त पाईपलाइन टाकण्यास मज्जाव करीत आहे, असे सांगण्यात येत आहे. चौकशीअंती हा व्यक्ती नगरपालिकेचाच सफाई कर्मचारी आहे, असे आढळून आले. ही जागा पालिकेच्या मालकीची असूनही संबंधित व्यक्ती या जागेवर हक्क प्रस्थापित करीत आहे. (प्रतिनिधी)आरोग्याच्या प्रश्न गंभीर सार्वजनिक शौचालयांचा मैला खुल्या जागेतून वाहून नेऊन जंगलात साडला जात आहे.गेली कित्येक वर्षे मोलमजुरी करून जगणाऱ्या १५० ते २०० लोकसंख्या असणाऱ्या या वस्तीच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून, याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून ठोस कार्यवाही व्हावी, तसेच नागरिकांना आरोग्यदायी जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.