वारकरी कलाकारांना मानधन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST2021-09-08T04:46:17+5:302021-09-08T04:46:17+5:30

वाई : महाराष्ट्र शासनाने वारकरी कलाकारांना आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. परंतु वारकरी सांप्रदयातील ...

Pay honorarium to Warkari artists | वारकरी कलाकारांना मानधन द्या

वारकरी कलाकारांना मानधन द्या

वाई : महाराष्ट्र शासनाने वारकरी कलाकारांना आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. परंतु वारकरी सांप्रदयातील काही मंडळी या मानधनापासून वंचित आहेत. शासनाने सहानुभूतिपूर्वक विचार करून कलाकारांना मानधनासह विविध सुविधा द्याव्यात, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेने केली आहे.

याबाबत तहसीलदार रणजीत भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाई तालुक्यात अनेक वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, भारुडकार, मृदंग वादक, गायक आदी कलाकार आहेत. वारकरी सांप्रदाय हा समाजाला नेहमी वेगळी दिशा देण्याचे काम करीत असतो. त्यांनाही पाच हजार मानधन, वैद्यकीय सुविधा, एसटी प्रवासात सवलत, पेन्शन योजना लागू करण्यात यावी. तरच हा कलाकार वर्ग योग्य पद्धतीने समाज प्रबोधनाचे कार्य करेल. त्यामुळे शासनाने मान्य केलेले मानधन तातडीने अदा करावे.

निवेदनावर वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष अशोक बुवा पाटणे, सचिव राजेंद्र शिंदे, भरत बागल, बबन सपकाळ, तुकाराम निगडे, बाजीराव नवघणे, शिवाजी चव्हाण, रामचंद्र चिकणे, रामभाऊ तुपे, धर्माजी भोसले, मानसिंग भोसले, हणमंत शिंदे, दत्तात्रय पवार, तानाजी नवले, राजेंद्र चिकणे, बाबूराव कदम, आनंदराव पाटील, शिवाजी गाढवे, गुलाब रोकडे यांच्या सह्या आहेत.

Web Title: Pay honorarium to Warkari artists