शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत ४० टक्के मार्कस्, पण सायन्सला ॲडमिशन हवंय; कला शाखेकडे ओढा कमी 

By दीपक देशमुख | Updated: July 4, 2025 18:11 IST

अनुदानित तुकड्या बंद पडण्याची भीती

दीपक देशमुखसातारा : दहावीत मुलांना कमी गुण असले, तरी विज्ञान शाखाच हवी, असा पालकांसह विद्यार्थ्यांचा अट्टाहास वाढत आहे. अभ्यासक्रम पेलण्याची क्षमता नसणारा विद्यार्थीविज्ञान शाखेकडे ओढला जातो. त्यामुळे कला शाखेकडे यंदाही ओढा कमी आहे. राज्यात कला शाखेच्या तिप्पट अर्ज विज्ञान शाखेसाठी आले आहेत. त्यामुळे शासनाने कला शाखेच्या अभ्यासक्रम कालानुरुप बदलण्याची व विशेष आर्थिक तरतूद वाढविण्याची अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.राज्यातून १० लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी यावर्षी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली. यामध्ये २ लाख ३१ हजार विद्यार्थ्यांनी कलाशाखेसाठी ऑनलाईन अर्ज केला. तर विज्ञान शाखेसाठी ६ लाख ९ हजार जणांनी नोंदणी केली. विज्ञान शाखेतून विविध वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळला.यामुळे गुण कितीही कमी असले, तरी विज्ञान शाखेलाच प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धडपड सुरू आहे. परिणामी कला शाखेकडे जाणाऱ्यांची संख्या दरवर्षी कमी होत चालली आहे. त्यामुळे भविष्यात कलाशाखा बंद पडण्याची भीती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.

कला शाखेसाठी विशेष तरतूद..एका तुकडीत ८० विद्यार्थी अपेक्षित आहेत. परंतु, प्रवेश कमी होत असल्याने काही अनुदानित तुकड्या बंद होणार आहेत. अनुदानित तुकडी टिकवण्यासाठी शासनाने निकष शिथिल करण्याची गरज आहे. तसेच कला शाखेसाठी विशेष तरतूद करण्याची गरज आहे, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश करण्याची गरजकला शाखेत भाषा, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र असे अनेक महत्त्वपूर्ण विषय आहेत. तथापि, याबरोबरच कला शाखेतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम शिकता आला, तर त्यांना जास्त संधी उपलब्ध हाेतील. इतर अभ्यासक्रमांमध्येही कला शाखेतील एखादा विषय ऐच्छिक ठेवता येतील. याविषयी शासनाने विचार करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

सामाजिक असंवेदनशीलतेमुळे सध्या सामाजिक क्रौर्य वाढू लागले आहे. कला शाखेतून संवेदनशील माणूस घडत असतो. कला शाखा ही समाज घडविण्यासाठी गरजेची आहे. अनेक साहित्यिकांचे लेखन, समाजसुधारकांचे कार्य, देशाचा इतिहास, राजकारण, संविधान याची माहिती युवकांना होणे गरजेचे आहे. यातूनच जागृत नागरिक तयार होतात. शासनाने कला शाखेच्या तुकड्या सुरक्षित राहण्यासाठी विशेष तरतूद करावी. - प्रा. सुनील शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य - राज्य कार्याध्यक्ष 

सरकारने कला शाखेचे सक्षमीकरण झाले पाहिजे. पारंपरिक घोकमपट्टी अभ्यासक्रम बदलून प्रायोगिक अभ्यासक्रम सुरू व्हावेत. नवे हितकारक काय करता येईल यावर विचार व्हावा. व्यावसायिक, भाषिक, कौशल्य आधारित शिक्षण देण्याची गरज आहे. विज्ञान शाखेकडे जेवढ्या गांभिर्याने पाहिले जाते तेवढेच गंभीरपणे काम कला शाखेसाठी व्हावे. - प्रा. सुभाष वाघमारे, उपप्राचार्य, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा