शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

‘पार्किंग’चे गांभीर्य पालिकेला उमजले!

By admin | Updated: August 18, 2014 23:24 IST

वाहतूक समस्या : सातारा पालिकेच्या एकाच सभेत सहा ठिकाणचे प्रश्न मार्गी

सातारा : शहरातील पार्किंगची समस्या हे एक दुखणेच आहे. वाहनांची संख्या वाढतेय तशी रस्ते अपुरे पडू लागले आहेत. यावर पालिकेने उपाय काढला असून, शनिवारी झालेल्या सभेत शहरातील विविध ठिकाणचे पार्किंगचे प्रश्न मार्गी लावले आहेत. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. रविवार पेठेतील सि. स. नं. ५०७ ही जागा शासनाकडून पार्किंगसाठी मागणे, सोमवार पेठेतील डॉ. जवाहर मुनोत चौक ते न्यू इंग्लिश स्कूलअखेर सम-विषम पार्किंग करणे, पै चौक ते ५०१ पाटी अखेर सम-विषम तारखांना पार्किंग करणे, पालिका मुख्य इमारतीलगत भराव टाकून पार्किंगची सोय करणे, शनिवार पेठेतील ८६७ ही जागा पार्किंगसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मागणे, असे विषय या सभेत मंजूर करण्यात आले.दिवसेंदिवस पार्किंगची समस्या भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने टाकलेले हे आश्वासक पाऊल आहे. पार्किंग समस्या ही मूलभूत समस्या बनली आहे. अजूनही पालिकेने बांधलेल्या शॉपिंग सेंटर्सच्या पार्किंगचा वापर होताना दिसत नाही.राजवाडा परिसरात नो पार्किंग झोन तयार करण्याची गरज आहे. चांदणी चौक ते राजवाडा चौपाटी या रस्त्यावर नो हॉकर्स झोन तयार केला असला तरी अद्यापही याठिकाणी फळविक्रेत्यांना हटविण्यात आलेले नाही.  अभयसिंहराजे भोसले शॉपिंग सेंटरच्या समोरचा फूटपाथ काही दिवसांपूर्वी मोकळा केला होता. मात्र, अद्यापही त्यावरून नागरिकांना चालता येत नाही. याबाबतही पालिकेने निर्णय घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी) --शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सातारा शहरातील समस्यांचे निवारण करता येऊ शकते. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावाच्या दुर्घटनेनंतर किल्ल्याच्या पायथ्याशी संरक्षक भिंत बांधणे आवश्यक बनले आहे.-अभिजित बापटनगरपालिकेने नुकत्याच झालेल्या सभेत वाहने पार्किंगच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पार्किंगसाठी जागेची मागणी करणे आवश्यकच होते. मात्र, शहरातील बऱ्याचशा इमारतींच्या बेसमेंटमध्ये पार्किंगची जागा दुकान गाळ्यांनी घेतली आहे. अशा गाळेधारकांवर कारवाई होणे आवश्यक असून, पालिकेने ही कारवाई करावी.- तेजस शिर्के