शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ वाहते कृष्णामाई’तर्फे चित्रकला स्पर्धा

By admin | Updated: February 2, 2015 23:59 IST

६ रोजी आयोजन : वीस हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

वाई : वाई तालुक्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सुरू केलेल्या ‘स्वच्छ वाहते कृष्णामाई’ अभियानातर्फे वाई तालुकास्तरीय शालेय चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा दि. ६ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा दि. ५ ते ८वी व ९ वी ते १२ अशा दोन गटांमध्ये होणार आहे. वाई तालुक्यातील २०,००० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. विजेत्या पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे १,१००, ७०० व ५०० रुपयांची भेटवस्तू व गौरवचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. तसेच विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त सहभाग नोंदविणाऱ्या पहिल्या तीन शाळांना अनुक्रमे ५०००, ४००० व ३००० रुपयांची भेट व गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. नदी, गाव, पाणवठा व जलस्रोत व वैयक्तिक पातळीवर नदी स्वच्छतेमध्ये आपण कसा सहभाग देऊ शकतो, हे विद्यार्थी या स्पर्धेतून व्यक्त करू शकतील, असे विषय यासाठी निवडण्यात आले आहेत. वाई तालुका मुख्याध्यापक संघाचे मुख्य नियोजक आहेत. दिशा अ‍ॅकॅडमी, वाई हे प्रायोजक तर ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहेत. माहितीसाठी अनिल सपकाळ ९४२०७७२११७, दिलीप जाधव ९९२१८३७५०७ यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)