मतदानाला सकाळी सुरुवात झाल्यानंतर गाडीवर पक्षाचे चिन्ह लावून फिरणाऱ्या एका व्यक्तीवर शहर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
फलटण येथील शासकीय विश्रामगृह शेजारी मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामा शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र, हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान ...
सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के इतके मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी सातारा, माढा लोकसभा मतदार संघासाठी मतदान सुरू झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के इतके तर सकाळी अकरा वाजेपर्यंत सातारा मतदार संघात साडेसतरा ...
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील अभिनेत्याने येथे केले मतदान आणि श्रमदानही. अभिनेते विपुल साळुंखे यांनी मंगळवारी आपला मतदानाचा हक्क बजावून सामाजिक बांधिलकी जपत आसनगाव, ता. कोरेगाव येथे हाती टिकाव, खोरे हाती घेऊन श्रमदान केले. ...
कऱ्हाड तालुक्यातील दक्षिणला ३१० तर उत्तरला ३३८ मतदान केंद्रावर मतदानास गावागावातील तरुण, वयोवृद्ध मतदारांनी मतदानास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात सकाळी सात ते नऊ यावेळेत कऱ्हाड उत्तरेत ६.६२ टक्के मतदान झाले तर कऱ्हाड दक्षिणेत ६.२० टक्के मतदान झाले. ...
सातारा येथील समर्थ मंदिर परिसरात असलेल्या दुकानाची दहा ते बाराजणांनी तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...
सातारा येथील गुरुवार बागेजवळ सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामावरून पडून रवी भिकू चव्हाण (वय ३२, रा. सिध्दिविनायक कॉलनी, शाहूपुरी सातारा) या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...