Power supply of 2.5 lakh consumers affected by floods in western Maharashtra | पश्चिम महाराष्ट्रातील महापुरग्रस्त ३.१५ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत
पश्चिम महाराष्ट्रातील महापुरग्रस्त ३.१५ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

ठळक मुद्देसुमारे ५ लाख ७० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता१ लाख ६९ हजार कृषीपंपांसह सुमारे ४ लाख शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांचा समावेश होतापूरस्थिती ओसरल्यानंतर प्रामुख्याने सध्या पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त जवळपास सर्वच भागातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला

सोलापूर :  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे खंडित झालेला किंवा संभाव्य धोका टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या सुमारे ३ लाख १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा मंगळवार (दि. 13) पर्यंत सुरळीत करण्यात आला आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचाºयांनी पूरस्थितीतही अविश्रांत परिश्रम घेऊन वीजग्राहकांना दिलासा दिला आहे.  

पश्चिम महाराष्ट्रात विविध भागातील पूरस्थितीमुळे ४४ उपकेंद्रांसह कृषी व अकृषक अशा एकूण ५९३ वीजवाहिन्यांवरील १७,१८९ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी सुमारे ५ लाख ७० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता. यामध्ये १ लाख ६९ हजार कृषीपंपांसह सुमारे ४ लाख शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांचा समावेश होता. पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रामुख्याने सध्या पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त जवळपास सर्वच भागातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. यामध्ये ७६२८० कृषिपंपांसह पुणे जिल्ह्यातील १ लाख ४ हजार, कोल्हापूर १ लाख २५ हजार, सांगली  ४८,२५०, सातारा  २२,९२० तर सोलापूर १३६६० अशा एकूण सुमारे ३ लाख १५ हजार घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अशा अकृषक वीजग्राहकांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील १३२ ग्राहक वगळता सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातील शहरी भागात १०० टक्के वीजपुरवठा सुरु झाला आहे. तर ग्रामीण भागामध्ये पुणे ११२, सातारा -३२४० व सोलापूर जिल्ह्यातील ४९ अशा एकूण ३३०१ ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या बंद आहे. हे सर्व ग्राहक अतिदुर्गम तसेच डोंगराळ भागातील असल्याने तेथील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीला अडथळे येत आहेत. महापुराचा मोठा फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती ओसरत असून शहरी व ग्रामीण भागातील सुमारे १ लाख ५८ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्याचे अविश्रांत प्रयत्न सुरु आहेत.  

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे व बारामती परिमंडलातून २५ हजार नवीन वीजमीटर, ४० हजार किलोलिटर आॅईल, १०० केव्हीए क्षमतेचे ८० रोहित्र तसेच ४१० वीजखांब, उच्च व लघुदाब वीजवाहिन्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या पुरग्रस्त भागात पाठविण्यात आले आहेत. याशिवाय औरंगाबाद, लातूर, उद्गीर, नांदेड, निलंगा, ठाणे, वसई, वाशी, कल्याण आदी ठिकाणांहून वीजयंत्रणेचे विविध साहित्य कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा ग्राहकांचे वीजमीटर महावितरण स्वखचार्ने बदलून देणार आहे. 

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे साहित्य व कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. राज्याचे ऊजार्मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  संजीव कुमार हे वीजपुरवठ्याच्या कामांचा दैनंदिन आढावा घेत आहेत. पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक सुनील पावडे हे गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूर व सांगलीच्या दौºयावर आहेत. पावडे व कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले हे आवश्यक साधनसामग्रीसह अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्याचे नियोजन तसेच इतर शासकीय यंत्रणेसोबत समन्वयासाठी कार्यरत आहेत. वीजयंत्रणेची दुरुस्ती व कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करीत आहेत. पुणे, बारामती व सातारा येथील पथकांसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अभियंते व कर्मचारी आणि कंत्राटी कुशल कर्मचारी असे सुमारे ५ हजार अभियंता व कर्मचारी वीजयंत्रणा दुरुस्ती व वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात युद्धपातळीवर कार्यरत आहेत. 


Web Title: Power supply of 2.5 lakh consumers affected by floods in western Maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.