शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चकाचक रस्त्यावर पाचच महिन्यांत टिकाव!

By admin | Updated: September 18, 2014 23:22 IST

येरे माझ्या मागल्या : जुनी जलवाहिनी दुरुस्तीसाठी पालिकेने खोदला रस्ता

सातारा : शहरातील गल्लीबोळातील रस्त्याची चाळण झाल्याने सातारकर दोन वर्षांपासून हैराण झाले होते. त्यानंतर पालिकेने सर्वच प्रमुख रस्त्याचे डांबरीकरण केले; पण हे सुख सातारकरांना फार काळ मिळेल, असे वाटत नाही. जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी चक्क पाच महिन्यांतच डांबरी रस्त्यावर टिकाव मारला आहे. चारही बाजूंना डोंगराने वेढलेल्या सातारा शहराला वाढण्यास फार वावच मिळालेला नाही. त्यामुळे वरचा बोगदा, राजपथ व खालचा रस्ता तसेच राधिका रोड या मार्गावरच शहर विभागले गेले आहे. त्याचप्रमाणे सातारा शहरातील सरासरी पर्जन्यमानही चांगले असल्याने उतारावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत असते. त्यामुळे रस्त्याची चाळण लवकरच होत असते.सर्वच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सातारकर तीन-चार वर्षांपासून वैतागले होते. रस्त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. काही सामाजिक संघटनेने याकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करणे, रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी अनोखे आंदोलने केली होती. तर काही वेळा रस्त्यावरील खड्डे मोजण्याची मोहीम राबविली गेली होती. सरतेशेवटी पालिकेने शहरातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हाती घेण्यात आले. डांबरीकरणामुळे चकाचक झालेल्या रस्त्यावर गाड्या सुसाट धावत होत्या; पण सातारकरांचे हे सुख फार टिकेल, असे वाटत नाही. डांबरीकरणापूर्वी सर्वच भागात पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली होती. तसेच या योजनेची चाचणीही घेण्यात येत होती. तत्पूर्वी नवीन नळजोडण्या घेण्यासंदर्भात सूचना करून सातारकारंना मुदत दिली होती. तरीही या ठिकाणी जुन्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जात आहे. खालच्या रस्त्यावर शेटे चौकाजवळील नकाशपुरा भागात जुन्याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जात आहे. या ठिकाणी काही दिवसांपासून पाणी येत नाही. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीसाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी खड्डे खोदण्यास सुरुवात केली आहे. पोलीस मुख्यालयापासून जागोजागी खोदकाम करून जुनी जलवाहिनी तपासली जात आहे. त्यामुळे जलवाहिनीचे काम झाल्यानंतर पूर्ववत रस्ता करावा, अशी मागणी सातारकरांमधून होत आहे. (प्रतिनिधी)या खड्ड्यांचे प्रायोजकनुकताच साजरा झालेल्या गणेशोत्सवात खालच्या रस्त्यावर विद्युत रोषणाई व जाहिरात फलक लावण्यासाठी रस्त्याच्या कडेलाच खड्डे खोदून बांबू रोवण्यात आले होते. हे करत असताना ‘बीएसएनएल’ची जमिनीतील केबल तुटली गेली. त्यामुळे विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत करण्यासाठी ‘बीएसएनएल’ला खड्डे खोदावे लागले होते.