शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यातील घटनेबाबत चौकशीचे आदेश : देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST

सातारा : भंडारा येथील शासकीय रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून १० बालकांचा मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश ...

सातारा : भंडारा येथील शासकीय रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून १० बालकांचा मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश यंत्रणेला दिले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मंत्री देसाई माध्यमांशी बोलताना म्हणाले की, भंडाऱ्यामधील शासकीय रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डमध्ये जो प्रसंग घडला. त्यामुळे १० शिशूंचा मृत्यू झाला. ही दु:खद घटना आहे. स्थानिक अधिकारी पोलिसांशी बोललो आहे. प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. शॉर्टसर्किटमुळे हा प्रसंग घडला. या घटनेचे नेमके कारण काय आहे, याची सखोल चौकशी केली जाईल. भंडारा जिल्हा शल्यचिकित्सकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत जाहीर केलेली आहे. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. चौकशी केल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

दरम्यान, सातारा शहरातील ग्रेड सेपरेटर येथे लावलेला फलक फाडल्याची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी गेले. याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्व अधिकारी सतर्क राहिले आहेत. हे ज्याने कोणी जाणीवपूर्वक केले असेल तर तो समोर येईल, त्याला शोधून काढतील. हा प्रसंग दुर्दैवी आहे. राज्यातील जनतेने शांतता राखावी, असेही मंत्री देसाई म्हणाले.

ग्रेड सेपटरेटच्या उद्घाटनाची कल्पनाच नव्हती

ग्रेड सेपरेटचे उद्घाटन झाले त्याची मला काहीही कल्पना नव्हती. सोशल मीडियावर मला याची माहिती मिळाली. याबाबतीतील कुठलीही कल्पना मला देण्यात आली नव्हती, असे स्पष्टीकरण मंत्री देसाई यांनी व्यक्त केले.