शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

टपाल तिकीटावर झळकण्याची सातारकरांना संधी!

By admin | Updated: August 19, 2014 23:43 IST

‘माय स्टॅम्प’ : पोस्टाच्या अभिनव योजनेस उत्साहात प्रारंभ

सातारा : नोकरीसाठी अर्ज, राख्या पाठविण्यासाठी प्रत्येकाने केव्हाना केव्हा पाकिट पाठविले असेल. त्यासाठी आवश्यकता भासते ती टपाल तिकीटाची. पाकिटाच्या वजनाएवढे विविध किमतीचे तिकीटे घेत असतो. याच तिकीटावर फोटो झळकविण्याची संधी सातारकरांना उपलब्ध झाली आहे. या योजनेस मंगळवारी मुख्य टपाल कार्यालयात प्रारंभ झाला. टपाल तिकीटावर आपलाही फोटो असावा, हे स्वप्न अनेकांनी पाहिलेले पाहिलेले असल्यास ते आता नक्कीच सत्यात उतरणार आहे. व्यवसायवृद्धीसाठी टपाल खात्याने ‘माय स्टॅम्प’ ही अभिनव योजना आणली आहे. या योजनेचे उद्घाटन ‘एलआयसी’चे प्रादेशिक अधिकारी संजीव मोहिते यांच्या हस्ते केले. अध्यक्षस्थानी प्रवर अधीक्षक डाकघर आर. एन. कुलकर्णी होते. गणेश वडूरकर, धीरज कदम, शशिकांत गंगावणे, मनोज विभूते उपस्थित होते. या योजनेंतर्गत आपल्या फोटोचे तिकीट प्रसिद्ध कराणाऱ्यांसाठी पोवई नाक्यावरील मुख्य टपाल कार्यालयात एक अर्ज उपलब्ध आहे. हा अर्ज भरून दिल्यानंतर त्यासोबत पॅनकार्ड, रहिवास दाखला व ओळखपत्राची झेरॉक्स द्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याठिकाणीच आपला फोटो काढून काही वेळातच तिकीटाची प्रिंट दिली जाईल, किंवा पोस्टाने घरपोच केली जाईल. टपाल खात्याने यासाठी एनआयसीचे सॉफ्टवेअर बनवून घेतले आहे. हे तंत्रज्ञान चालविण्यासाठी दिल्ली येथे खास प्रशिक्षण आयोजित केले होते. यासाठी सातारा जिल्ह्यातून चार कर्मचारी गेले होते. तिकीटासाठी काही थिम तयार आहेत. यामध्ये ताजमहाल, राशीचक्र, फुले, पंचतंत्र हे सध्या उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)