शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे... चौकात कारंजे; पण रस्त्यात खड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST

कऱ्हाड : शहरातील भेदा चौक ते बैलबाजार रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. चार दिवसांपूर्वी याच खड्ड्याच्या विषयावरून नागरिकांनी ‘बॅनर’बाजी ...

कऱ्हाड : शहरातील भेदा चौक ते बैलबाजार रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. चार दिवसांपूर्वी याच खड्ड्याच्या विषयावरून नागरिकांनी ‘बॅनर’बाजी करीत पालिकेच्या कारभारावर आसूड ओढला होता. आता ते बॅनर गायब झालेत; पण रस्त्यातील खड्डे ‘जैसे थे’ असल्याचे दिसते. चौकात कारंजे; मात्र रस्त्यात खड्डे, अशी येथील स्थिती आहे.

कऱ्हाडातील भेदा चौक ते बैलबाजार रोड या पाचशे मीटर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पालिकेकडे वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरूस्ती होत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गांधीगिरी करीत रविवारी या रस्त्यावर फलक लावले. पालिकेच्या कारभारावरील नागरिकांचा रोष या फलकांतून स्पष्ट दिसत होता. पाचशे मीटरमध्ये पडलेले शेकडो खड्डे ही येथील मुख्य समस्या आहे. वास्तविक, हा रस्ता रुंद आहे. मात्र, खड्ड्यांमुळे वाहने चालवायची कशी, असा प्रश्न चालकांना पडतो. खड्डे चुकवित मार्ग काढताना चालकांना कसरत करावी लागते.

गत अनेक वर्षांपासून या रस्त्यावर डांबरच पडले नसल्याचे येथील नागरिक सांगतात. तसेच दरवर्षी केवळ दुरूस्तीचे आश्वासन दिले जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. वारंवार मागणी करूनही खड्डे मुजविले जात नसल्यानेच संतप्त होऊन नागरिकांनी हे फलक उभारले होते. सध्या हे फलक काढण्यात आले आहेत. मात्र, खड्ड्यांचा प्रश्न अद्यापही कायम आहे.

- चौकट

चरी खोदल्या, मुजविणार कोण?

बैलबाजार रस्त्यावर तीन ठिकाणी आडव्या चरी खोदण्यात आल्या आहेत. मात्र, काम झाल्यानंतर त्या व्यवस्थितरित्या मुजविण्यात आलेल्या नाहीत. केवळ मुरुम टाकून त्याठिकाणी मलमपट्टी करण्यात आली आहे.

- चौकट (फोटो : ०७केआरडी०६)

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग

रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागलेले असतानाच दुतर्फा केले जाणारे पार्किंगही वाहतुकीला अडथळा ठरत आहे. जेसीबी, मालवाहतूक ट्रक, ट्रॅक्टर अशा अवजड वाहनांसह अनेक वाहने या रस्त्याकडेला कित्येक दिवस पार्क केलेली असतात. त्यामुळे खड्डे चुकविताना अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

- चौकट (फोटो : ०७केआरडी०४)

गटार तुंबलेली; कचऱ्याचेही साम्राज्य

खड्ड्यांनी नागरिकांचा जीव काढला असतानाच या रस्त्यालगत असलेली गटर ठिकठिकाणी तुंबली आहे. रस्त्याच्या सुरुवातीलाच उघड्यावर टाकलेला अन्नपदार्थांचा कचरा दुर्गंधी निर्माण करीत असून, चौकातूनच नागरिकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

- चौकट (फोटो : ०७केआरडी०७)

पाचशे मीटरवर शंभरफुटी रस्ता

भेदा चौकातून बैलबाजारच्या गेटपर्यंत रस्त्याची अवस्था दयनीय आहे. मात्र, त्यापुढे शंभरफुटी चकाचक आहे. या काँक्रिट रस्त्यामुळे मलकापूरपर्यंतची वाट सुकर झाली असली, तरी सुरुवातीचा पाचशे मीटरचा रस्ता प्रवाशांना धायकुतीला आणतो.

लोगो : ऑन दी स्पॉट

फोटो : ०७केआरडी०३

कॅप्शन : रस्त्यात रविवारी नागरिकांनी लावलेले फलक सध्या काढण्यात आले आहेत. मात्र, रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत.

फोटो : ०७केआरडी०५

कॅप्शन : कऱ्हाडातील भेदा चौक ते बैलबाजार रस्त्याची पाचशे मीटर अंतरात अक्षरश: चाळण झाली आहे.