शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

उपनिबंधक कार्यालयात ‘आॅनलाइन’

By admin | Updated: July 13, 2014 22:25 IST

साताऱ्याची आघाडी : सहकारी संस्थांच्या आॅडिटची स्थिती कळणार तत्काळ

सातारा : सहकार विभागाने सर्व संस्था व आॅडिटरची आॅनलाईन नोंदणी करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार आतापर्यंत २७७ आॅडिटरांची आॅनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. सहकारी संस्थांही आॅनलाइन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सहकार विभागाच्या आॅनलाइन नोंदणीत सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली असून, सहकारी संस्थांना आता आॅडिटर शोधण्याची गरज नाही. सहकारी संस्था व आॅडिटर यांची यादीच आॅनलाइन झाली आहे. आता यापुढे सहकारी संस्थांच्या आॅडिटची सर्व माहिती आॅनलाइन मिळणार आहे.‘अ’ वर्गातील आॅडिटर ‘अ’ व ‘ब’ वर्गातील संस्थांचे आॅडिट करू शकणार आहेत. तर ‘ब’ व ‘क’ वर्गातील आॅडिटर ‘ब’ व ‘क’ वर्गातील संस्थांचे आॅडिट करू शकणार आहेत. त्यानुसार आॅनलाइन माहिती टाकल्यानंतर आॅडिटची सर्व अहवाल आॅनलाइन टाकता येणार आहे. त्यामुळे संस्थांची खरी माहिती संगणकावर पाहता येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २३०० संस्थांचे आॅडिट रिपोर्ट जिल्हा उपनिबंधक यांना आॅनलाइन पद्धतीने उपलब्ध झाले आहेत. या सर्व प्रक्रियेमुळे सहकार विभागाचा कागदावर व कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च वाचणार असून, सर्व कामे वेळेत होणार आहेत.परिणामी ‘पेपरलेस आॅफिस’ संकल्पना यानिमित्ताने सहकार विभागात आगामी काळात पाहायला मिळणार आहे. सहकारी संस्था व आॅडिटर आॅनलाइन झाल्याने पुढील वर्षीपासून संस्थांचे आॅडिट करणे व त्यांचे अहवाल मिळविणे सहकार विभागाला सोपे झाले आहे. त्यासाठी कर्मचारी गुंतून राहणे व वेळेचा अपव्यय वाचणार आहे. जिल्ह्यात साडेचार हजार सहकारी संस्था असून, आतापर्यंत २३०० सहकारी संस्थांचे आॅडिट रिपोर्ट जिल्हा उपनिबंधक कार्यालयास मिळाले आहेत. सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने आॅडिटरची आॅनलाइन नोंदणी सर्वात प्रथम पूर्ण केली आहे. त्यासाठी उपनिबंधक कार्यालयात स्वतंत्र सोय करण्यात आली होती. (प्रतिनिधी)