उपनिबंधक कार्यालयात ‘आॅनलाइन’

By Admin | Updated: July 13, 2014 22:25 IST2014-07-13T22:21:17+5:302014-07-13T22:25:41+5:30

साताऱ्याची आघाडी : सहकारी संस्थांच्या आॅडिटची स्थिती कळणार तत्काळ

'Online' at the Deputy Registrar's Office | उपनिबंधक कार्यालयात ‘आॅनलाइन’

उपनिबंधक कार्यालयात ‘आॅनलाइन’

सातारा : सहकार विभागाने सर्व संस्था व आॅडिटरची आॅनलाईन नोंदणी करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार आतापर्यंत २७७ आॅडिटरांची आॅनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. सहकारी संस्थांही आॅनलाइन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सहकार विभागाच्या आॅनलाइन नोंदणीत सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली असून, सहकारी संस्थांना आता आॅडिटर शोधण्याची गरज नाही. सहकारी संस्था व आॅडिटर यांची यादीच आॅनलाइन झाली आहे. आता यापुढे सहकारी संस्थांच्या आॅडिटची सर्व माहिती आॅनलाइन मिळणार आहे.
‘अ’ वर्गातील आॅडिटर ‘अ’ व ‘ब’ वर्गातील संस्थांचे आॅडिट करू शकणार आहेत. तर ‘ब’ व ‘क’ वर्गातील आॅडिटर ‘ब’ व ‘क’ वर्गातील संस्थांचे आॅडिट करू शकणार आहेत. त्यानुसार आॅनलाइन माहिती टाकल्यानंतर आॅडिटची सर्व अहवाल आॅनलाइन टाकता येणार आहे. त्यामुळे संस्थांची खरी माहिती संगणकावर पाहता येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २३०० संस्थांचे आॅडिट रिपोर्ट जिल्हा उपनिबंधक यांना आॅनलाइन पद्धतीने उपलब्ध झाले आहेत. या सर्व प्रक्रियेमुळे सहकार विभागाचा कागदावर व कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च वाचणार असून, सर्व कामे वेळेत होणार आहेत.
परिणामी ‘पेपरलेस आॅफिस’ संकल्पना यानिमित्ताने सहकार विभागात आगामी काळात पाहायला मिळणार आहे. सहकारी संस्था व आॅडिटर आॅनलाइन झाल्याने पुढील वर्षीपासून संस्थांचे आॅडिट करणे व त्यांचे अहवाल मिळविणे सहकार विभागाला सोपे झाले आहे. त्यासाठी कर्मचारी गुंतून राहणे व वेळेचा अपव्यय वाचणार आहे. जिल्ह्यात साडेचार हजार सहकारी संस्था असून, आतापर्यंत २३०० सहकारी संस्थांचे आॅडिट रिपोर्ट जिल्हा उपनिबंधक कार्यालयास मिळाले आहेत.
सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने आॅडिटरची आॅनलाइन नोंदणी सर्वात प्रथम पूर्ण केली आहे. त्यासाठी उपनिबंधक कार्यालयात स्वतंत्र सोय करण्यात आली
होती. (प्रतिनिधी)

Web Title: 'Online' at the Deputy Registrar's Office