चचेगांवात एकास रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:34 IST2021-01-17T04:34:45+5:302021-01-17T04:34:45+5:30

भगवान महादेव पवार (४६) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय जगन्नाथ पवार याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला ...

One person was beaten with a rod in Chachegaon | चचेगांवात एकास रॉडने मारहाण

चचेगांवात एकास रॉडने मारहाण

भगवान महादेव पवार (४६) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय जगन्नाथ पवार याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चचेगांव येथे भगवान पवार यांच्या घरासमोर अक्षय जगन्नाथ पवार हा त्याच्या कुटुंबासह राहतो. शुक्रवारी रात्री भगवान पवार हे चौकात अंकुश आत्माराम पवार, शंकर जगन्नाथ पवार, निवास यशवंत पवार यांच्यासह गप्पा मारत बसले होते. त्यावेळी अक्षय जगन्नाथ पवार हा हातात लोखंडी रॉड घेऊन आला. त्याने भगवान पवार यांच्या कपाळावर मारून तसेच डाव्या हाताच्या मनगटावर मारून जखमी केले होते. जखमी पवार यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी पवार यांनी कराड ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे.

Web Title: One person was beaten with a rod in Chachegaon