जमीन वाटपावरून बसाप्पाचीवाडीत एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:40 IST2021-03-26T04:40:15+5:302021-03-26T04:40:15+5:30

साताराः जमीन वाटपाच्या कारणातून बसाप्पाचीवाडी येथे एकास हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एक महिलेसह ...

One beaten up in Basappachiwadi over land allotment | जमीन वाटपावरून बसाप्पाचीवाडीत एकास मारहाण

जमीन वाटपावरून बसाप्पाचीवाडीत एकास मारहाण

साताराः जमीन वाटपाच्या कारणातून बसाप्पाचीवाडी येथे एकास हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एक महिलेसह दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,

हरिदास सुरेश चव्हाण (वय ३१, रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) हे त्यांच्या घरात

होते. त्यावेळी तिथे त्यांचा भाऊ गणेश ऊर्फ बाबुराव सुरेश चव्हाण (रा. बसाप्पाचीवाडी) आला. त्यांच्यात जमीन वाटपावरून वाद झाला. त्यावेळी गणेश चव्हाण याने हरिदासला लाकडी दांडक्याने मारहाण केली तर आत्तेभाऊ सुनील विठ्ठल सोनावणे रा. विरमाडे, ता. सातारा याने लोखंडी टॉर्चने मारले तर भावजय सोनाली गणेश चव्हाण हिने हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने हरिदास जखमी झाले.

यावेळी या तिघांनी हरिदास याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही हरिदास यांनी म्हटले आहे.

Web Title: One beaten up in Basappachiwadi over land allotment