शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दफ्तर कपाटात; चाव्या बीडीआेंकडे!

By admin | Updated: July 13, 2014 22:52 IST

संघटना झिंदाबाद : १४५२ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प

सातारा : विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन पुकारले असून ‘ग्रामसेवक संघटना झिंदाबाद’ म्हणत जिल्ह्यातीलही सुमारे ९०० ग्रामसेवक आंदोलनात सहभागी झाले आहेत. ग्रामसेवकांनी दफ्तर कपाटात ठेवून चाव्या गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा केल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील जवळपास १४५२ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे.ग्रामसेवक हा ग्रामपंचायतींचा कणा असून, ग्रामपंचायतीमार्फत योजना राबवायच्या असतील तर ग्रामसेवकांशिवाय पर्याय नसतो. त्याचबरोबर विविध दाखल्यांसाठीही ग्रामसेवकांची आवश्यकता भासते. एकप्रकारे ग्रामसेवक हा शासन आणि जनता यामधील दुवाच समजण्यात येतो. पण, सध्या राज्यातील ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. मागील आठ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांना स्वतंत्र वेतनश्रेणी देण्यात यावी, २० ग्रामपंचायतींच्या पाठीमागे एक विस्तार अधिकार देण्यात यावा, प्रवासभत्ता ११०० वरून ३ हजार रुपये करण्यात यावा, नवीन ग्रामसेवकांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.जिल्ह्यातही या आंदोलनात सुमारे ९०० ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. यामुळे जवळपास १४५२ ग्रामपंचायतीतील कामकाज ठप्प झाले आहे. लोकांना दाखले, उतारे मिळणे अवघड झाले आहे. शाळाप्रवेश व इतर कामांसाठी ग्रामसेवकांचे दाखले आवश्यक ठरले आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांचा संप लवकरात लवकर संपण्याची प्रतीक्षा लोकांना लागली आहे. (प्रतिनिधी)