शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

अवकाळीने फटका दिलेल्या शेतकऱ्यांचा आकडा ६० हजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 5:50 PM

सातारा जिल्ह्यात अवकाळीचा पाऊस जस-जसा पडत आहे, तस-तसा पीक, फळबाग नुकसानीचा आकडा वाढू लागला आहे. चार दिवसांपूर्वी १ हजार ३०९ गावांतील १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा अंदाज होता; पण मंगळवारअखेर बाधित गावांची संख्या १ हजार ४८६ वर गेली असून, २३ हजार हेक्टरला हानी पोहोचल्याचे नजर अंदाजाने समोर आले आहे. तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ६० हजारांपर्यंत पोहोचलीय.

ठळक मुद्देबळीराजा कोलमडला : पावसाबरोबरच नुकसानीचे प्रमाण वाढले१४८६ गावांतील २३ हजार हेक्टरवरील पिके, फळबागांची हानी

नितीन काळेलसातारा : जिल्ह्यात अवकाळीचा पाऊस जस-जसा पडत आहे, तस-तसा पीक, फळबाग नुकसानीचा आकडा वाढू लागला आहे. चार दिवसांपूर्वी १ हजार ३०९ गावांतील १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा अंदाज होता; पण मंगळवारअखेर बाधित गावांची संख्या १ हजार ४८६ वर गेली असून, २३ हजार हेक्टरला हानी पोहोचल्याचे नजर अंदाजाने समोर आले आहे. तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ६० हजारांपर्यंत पोहोचलीय.जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती होती. दीडशेहून अधिक गावे आणि एक हजारच्या वर वाड्यावस्त्यांना पाण्यासाठी टँकर सुरू होते. तर गेल्यावर्षीच दुष्काळी तालुक्यातील खरीप आणि रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या पदरी पडला नव्हता.

यावर्षी तर सततच्या पावसाने ओल्या दुष्काळासारखी स्थिती उद्भवलीय. आॅक्टोबरमधील पावसाने तर १ नोव्हेंबरच्या नजरअंदाजानुसार जिल्ह्यात अंदाजे ११ हजार ७९९ हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसल्याचे समोर आले होते. १ हजार ३०९ गावे पीकहानीत बाधित झाल्याचा अंदाज होता.

यामध्ये पाटणमधील सर्वात अधिक २८५ गावे होती. मात्र, यानंतरही सतत पाऊस पडला. गेल्या पाच दिवसांत तर सर्वच तालुक्यांत पाऊस पडला आहे. सोमवारी रात्री तर खंडाळा, कोरेगाव आणि फलटण तालुक्याला धुवून काढले. यामुळे पीक आणि फळबाग नुकसानीचा आकडा आणखी वाढला आहे.अवकाळीच्या पावसाने १ नोव्हेंबरनंतरही फटका दिल्याने मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ४८६ गावांत पीकहानी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील २८५ गावांचा समावेश असून, यानंतर कऱ्हाड २१६, सातारा १५९, कोरेगाव आणि खटाव तालुका १३५, फलटण १२३, वाई ११६, जावळी १०३, महाबळेश्वर ८८, माण ६६ आणि खंडाळा तालुक्यातील ६० गावांचा समावेश आहे.

सर्वाधिक बाधित क्षेत्र हे फलटण तालुक्यात ८ हजार ६४६ हेक्टर असून, यानंतर पाटण तालुक्यात २ हजार ७८० हेक्टर आहे. खटाव तालुक्यात २ हजार २५२, सातारा २ हजार २१७, माण २ हजार १०९, खंडाळा १ हजार ६०९, कऱ्हाड तालुका १ हजार १६०, वाई १ हजार ९३, कोरेगाव ८८६ आणि जावळी तालुका १४२ व महाबळेश्वर तालुक्यात १०८ हेक्टरवरील क्षेत्राला अवकाळीचा फटका बसला आहे.बाधित शेतकऱ्यांची सर्वात अधिक संख्या फलटण तालुक्यात १३ हजार ११३ असून, यानंतर पाटण तालुका ११ हजार ९०३, सातारा ७ हजार, माण ४ हजार ८५१, खटाव ४ हजार ४२८, खंडाळा ४ हजार २३, वाई ३ हजार ६४३, कोरेगाव ३ हजार ५२७, कऱ्हाड ३ हजार ४८०, महाबळेश्वर २ हजार ४०० आणि जावळी तालुक्यात १ हजार १९४ आहे.जिल्ह्यात ५ नोव्हेंबरपर्यंत नुकसान झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक पीक हे सोयाबीनचे आहे. त्या खालोखाल भात, भुईमूग, ज्वारी, घेवडा आदीचे आहे. तसेच माण, फलटण, खटाव आणि कोरेगावमधील द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.३३ हजार शेतकऱ्यांच्या १५ हजार हेक्टरचे पंचनामेजिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत नुकसान झालेल्या अंदाजे एकूण क्षेत्रापैकी १५ हजार ११२ हेक्टरचे पंचनामे झाले होते. तर यामध्ये ३३ हजार ७० शेतकऱ्यांच्या पीक, फळबाग नुकसानीचा पंचनाम्यात समावेश आहे.

फलटण तालुक्यातील सर्वाधिक ५ हजार ३३१ हेक्टरवरील तर त्यानंतर माण तालुक्यातील २ हजार ४५२, सातारा २ हजार १९६, खंडाळा १ हजार ३६१ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झालेले आहेत. तर फलटण तालुक्यातील १० हजार ७२८ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्यानंतर सातारा ६ हजार १४ आणि पाटणमधील ४ हजार ८१६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. सर्वात कमी माण तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर