विलासकाकांसारखा नेता होणे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST2021-01-09T04:33:15+5:302021-01-09T04:33:15+5:30

सातारा : माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांना समाजाची नस माहीत होती. अनेक संस्थांची उभारणी करून त्यांनी समाजाला आधार ...

Not to be a leader like Vilaskaka | विलासकाकांसारखा नेता होणे नाही

विलासकाकांसारखा नेता होणे नाही

सातारा : माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांना समाजाची नस माहीत होती. अनेक संस्थांची उभारणी करून त्यांनी समाजाला आधार देण्याचे काम केले. त्यांच्यासारखा नेता होणे नाही, अशा शब्दांत मान्यवरांनी विलासकाकांना श्रध्दांजली वाहिली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांना श्रध्दांजली वाहताना समर्थ सदन येथे आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी प्रकाश गवळी, डॉ. अच्युत गोडबोले, किशोर तपासे, अविनाश कदम, बाबूराव शिंदे, रफिक बागवान, प्रकाश बडेकर, विनोद कुलकर्णी उपस्थित होते.

साहेबराव पवार म्हणाले, ‘विरोधात काम केले, पण मैत्री घट्ट ठेवली. समाजसेवा करायची, हे तत्त्व त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ठेवले. घट्ट विचाराचा माणूस म्हणून त्यांची समाजात वेगळी छाप होती. राजकारण करत असताना संपूर्ण उंडाळे भाग पिंजून काढायचे ठरवून, त्यांनी विकासाचा फड उभा केला. समाजाचे काम करणे हे काकांच्या जीवनातील महत्त्वाचे तत्त्व होते. तब्बल ५५ वर्षे विलासकाकांनी निष्ठावंत मैत्री जपली.’

अरुण गोडबोले म्हणाले, ‘जिव्हाळ्याचा असणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. समाजकारण करणारा नेता म्हणून त्यांची वेगळी ओळख आजही आहे आणि राहणार आहे. अनेक संस्था त्यांनी काढल्या आणि वाढवल्या आहेत.’

प्रकाश गवळी म्हणाले, ‘विलासकाकांनी १५ ते २० संस्था स्थापन करून अखेरच्या श्वासापर्यंत त्या सुरू ठेवल्या आहेत. काकांची ५० वर्षांची राजकीय कारकीर्द स्मरणीय राहणार आहे. समाजकारण, राजकारण कसे करावे हे काकांकडूनच शिकावे लागेल. नि:स्वार्थीपणे काम करण्याची शपथ घेऊन त्यांनी संघटन मोठ्या प्रमाणात केले होते.’

डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले, ‘वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून काकांकडे पहिले जाते. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. अनेक मान्यवरांनी काकांचे आपल्याला आलेले वेगवेगळे अनुभव सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबूराव शिंदे यांनी केले.

Web Title: Not to be a leader like Vilaskaka