शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
4
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
5
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
6
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
7
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
8
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
9
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
10
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
11
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
12
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
13
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
14
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
15
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
17
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
18
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
20
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
Daily Top 2Weekly Top 5

नो पार्किंग नव्हे.. डबल पार्किंग

By admin | Updated: December 1, 2014 00:16 IST

वाहन चालकांची शक्कल : रस्त्यामध्येच वाहने लावल्यामुळे वाहतुकीची कोंडी

सातारा : सातारा शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत आहे. नो पार्किंगमध्ये वाहनांवर कारवाई होत आहे. त्यामुळे आता सातारकरांनी यावर पर्याय म्हणून पार्किंगवर पार्किंग अशी शक्कल लढवून दंडात्मक कारवाईतून सुटका करून घेतली आहे.
गेल्या तीन-चार वर्षांत वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या मानाने बाजारपेठही वाढली आहेत; परंतु पार्किंगसाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने ही वाहने बाजारपेठेत लावताना नो पार्किंगची धास्ती लागून राहते.
नो पार्किंगमध्ये लावलेली वाहने वाहतूक शाखा क्रेनने उचलून दंडात्मक कारवाई करत असते, त्यामुळे या कारवाईतून बचण्यासाठी वाहनधारक ज्या ठिकाणी पार्किंग आहे, त्याच ठिकाणी पार्किंग करत आहेत. मग पूर्वी गाड्यावर गाडी लावली जात होती. त्यामुळे पार्किंगमधून लावलेले वाहन काढतानाही कसरती सुरू झाल्या आहेत. अनेकांना वाहने सरकावतच पार्किंगमधून वाहने काढावी लागत आहेत.
आधीच पार्किंग ठिकाणी जागा मिळणे मुश्किल असते; परंतु सध्या वाहनधारक ‘पार्किंगवर पार्किंग’ म्हणजेच वाहनांपुढे वाहन लावून दंडात्मक कारवाईतून सुटका करून घेत आहेत. त्यामुळे पुढच्या वाहनधारकांची वाहनेही त्याच ठिकाणी अडकून पडतातयेत, याचे कोणाला सोयर ना सुतक.
पोवई नाका, राजवाडा, देवी चौक, खणआळी, शेटे चौक, सीटी पोस्ट आॅफिस या ठिकाणी अधिक वाहने पार्किंग केली जातात. मुख्य बाजारपेठेदिवशी भाजी मंडईतही हीच अवस्था आहे. राजपथावरील अनेक व्यावसायिकांनी पार्किंगची व्यवस्था केली नसून पार्किंग क्षेत्रात अतिक्रमणे केल्यामुळे हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याकडे वेळेवर पालिका व वाहतूक पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)


नो पार्किंगवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकारच नाही पाहिजे. पार्किंगची सोय करावी, नंतरच दंड करा. नियम मोडला तरी दंड करा; पण नो पार्किंगमध्ये वाहने लावली तर दंड करण्याची प्रथा मोडली पाहिजे. कारण प्रशासनाने आधी पार्किंगची सोय केली पाहिजे आणि ही त्यांचीच जबाबदारी आहे.
- महेश कारंजकर



वाहतूक ठप्प होते म्हणून वन-वेची संकल्पना अंमलात आणली; परंतु पार्किंगच्या समस्येकडे दुर्लक्ष करून कसे चालेल. सध्या मुख्य बाजारपेठेत पार्किंगवर पार्किंग लावून निम्मा रस्ता अडविला जात आहे. त्यामुळे याचाही रहदारीवर परिणाम होत असून, याची जबाबदारी मात्र संबंधित प्रशासन घेत नाही.

शहरात अनेक नव्याने इमारती होत आहेत. पालिकेला दिलेल्या प्लॅनमध्ये पार्किंगची सोय दाखविली जाते; परंतु प्रत्यक्ष ती सोय नसल्याने आज वाहने रस्त्यावर दिसत आहेत. मुख्य बाजारपेठेत तर नव्याने अनेकांनी शोरुम पार्किंग क्षेत्रालय उघडले आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
- आमान संदे, वाहनधारक