Satara: दागिन्याची पर्स एसटी बसच्या वरील कप्प्यात ठेवली, चोरट्याने लंपास केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:57 IST2026-03-03T11:57:04+5:302026-03-03T11:57:27+5:30

नातीचा वाढदिवस साजरा करून पुण्यातून परतताना घडली घटना

Nine tolas of gold ornaments stolen from Pune Kurundwad ST | Satara: दागिन्याची पर्स एसटी बसच्या वरील कप्प्यात ठेवली, चोरट्याने लंपास केली

Satara: दागिन्याची पर्स एसटी बसच्या वरील कप्प्यात ठेवली, चोरट्याने लंपास केली

कराड : एसटीमधून सुमारे साडेचार लाखांचे नऊ तोळे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम, असा ४ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना पुणे-कुरुंदवाड एसटीमध्ये शुक्रवार, दि. २७ रोजी ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुवर्णा कृष्णा सावंत या आपल्या नातीच्या वाढदिवसासाठी पुणे येथे मुलाकडे गेल्या होत्या. वाढदिवस साजरा करून परत येत असताना पुणे येथे त्या पतीसोबत मुंबई-कुरुंदवाड एसटीमध्ये शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बसल्या. यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या पर्समध्ये नऊ तोळे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रक्कम होती.

प्रवासामध्ये त्यांना काही अंतर गेल्यानंतर झोप येऊ लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळील सोन्याचे दागिने रोख रक्कम असलेली पर्स पतीजवळ दिली. पतीने ती पर्स एसटी बसच्या वरील कप्प्यात ठेवली. त्यानंतर त्यांनी कराड येथे कोल्हापूर नाक्यावर आल्यानंतर पाण्याची बाटली घेण्यासाठी पर्समध्ये पैसे शोधले असता ते आढळून आले नाहीत. तसेच ठेवलेले सोन्याचे दागिने रोख रक्कमही मिळून आली नाही.

त्यांनी याबाबत एसटीचे चालक व वाहक यांना सांगून एसटीमध्ये शोध घेतला असता दागिने व रोख रक्कम मिळून आले नाही. त्यानंतर त्यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title : सतारा: बस के ऊपर के डिब्बे से गहने चोरी, पुलिस जांच जारी।

Web Summary : पुणे-कुरुंदवाड बस में एक महिला के 4.65 लाख रुपये के गहने और नकदी चोरी हो गई। घटना शुक्रवार को हुई। कराड पुलिस ने मामला दर्ज कर चोरी की जांच शुरू कर दी है, महिला को पहुंचने पर नुकसान का पता चला।

Web Title : Satara: Jewelry stolen from bus overhead compartment, police investigate.

Web Summary : A woman's jewelry and cash, worth ₹4.65 lakhs, were stolen from an overhead compartment on a Pune-Kurundwad bus. The incident occurred on Friday. Police in Karad have registered a case and are investigating the theft after the woman discovered the loss upon arrival.