शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

Satara: ‘कृष्णा’च्या पाण्यात जलपर्णीचा ‘कालवा’, कॅनॉलला विळखा 

By संजय पाटील | Updated: May 19, 2025 16:21 IST

काटेरी झुडपे, गवताचे साम्राज्य; सातारा, सांगलीत लाभक्षेत्र असूनही दुर्लक्ष, पाणी पोहोचेपर्यंत संपते आवर्तन

संजय पाटीलकऱ्हाड : साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीक्षेत्राची तहान भागविणाऱ्या कृष्णा कालव्यात सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. मात्र, कऱ्हाडपासूनच या कालव्याला जलपर्णीने वेढले असून ठिकठिकाणी मोठी पडझड झाल्याने प्रवाहात अडथळे निर्माण होत आहेत. जलपर्णी, काटेरी झुडपे, दगडांचा खच आणि दगड-मातीच्या ढिगाऱ्यामुळे कालव्याचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र आहे.

कऱ्हाड तालुक्यात कृष्णा नदीवर असलेल्या खोडशी बंधाऱ्यातून कृष्णा कालवा सुरू होतो. तेथून सैदापूरसह कऱ्हाड तालुक्यातील अन्य गावे व पुढे सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतून हा कालवा जातो. मात्र, सैदापूर येथे नागरी वस्त्यांचे सांडपाणी थेट कालव्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. तसेच अन्यही कारणांमुळे कालव्याची मोठी वाताहत झाली आहे. जलपर्णी, गवत, झुडपे कालव्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर उगवली आहेत. त्यामुळे संपूर्ण कालवा झाकोळला गेला आहे. काही ठिकाणी तर इथून कालवा वाहतो, यावर विश्वासच बसणार नाही एवढी भयावह स्थिती आहे. जलपर्णीने पाण्याचे पात्रच दिसेनासे झाले आहे.

देखभालीकडे होतेय दुर्लक्षजलपर्णीने व्यापलेल्या कालव्याचे अस्तित्वच सध्या धोक्यात आले आहे. एवढी कालव्याची दयनीय अवस्था आहे. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करणाऱ्या पाटबंधारे विभागाचे कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

पाणी पोहोचेपर्यंत संपते आवर्तन

  • अडथळे निर्माण झाल्यामुळे पाणी गतीने पुढील गावांपर्यंत पोहोचत नाही.
  • वेळेत पाणी न पोहोचल्याने शेतकऱ्यांना शेतीलाही पुरेसे पाणी देता येत नाही.
  • कालव्याला सोडलेले पाणी शेवटच्या गावात पोहोचेपर्यंत आवर्तन संपते.
  • कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

अनेक वर्षे दुरुस्तीचे काम रखडलेकृष्णा कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वर्षानुवर्षे कॅनॉल दुरुस्तीचे कामच झालेले नाही. ठिकठिकाणी कॅनॉल खचला आहे. झाडे, झुडपे, जलपर्णी, गवत वाढले आहे. सायपन पुलाशेजारी प्लास्टिक बाटल्या व कचरा साचून राहिला आहे.

लेखाजोखा

  • १८६८ : साली कालव्याचे काम पूर्ण
  • १८६८ : मधील रब्बी हंगामात पहिल्यांदा सोडले पाणी
  • ८६ : किलोमीटर कालव्याची लांबी
  • १३,३६६ : हेक्टर सिंचनाखालील क्षेत्र
  • ४५ : गावांना होतो पाण्याचा लाभ

सातारा, सांगलीच्या चार तालुक्यांत लाभक्षेत्रकऱ्हाड तालुक्यातील खोडशी येथे कृष्णा नदीच्या डाव्या तिरावरून कालव्यास प्रारंभ होतो. कऱ्हाड तालुक्यातील सैदापूर, गोवारे, टेंभू, कोरेगाव, कार्वे, वडगाव हवेली, शेणोली यासह सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, तासगाव तालुक्यातून हा कालवा जातो. चार तालुक्यांत कालव्याचे लाभक्षेत्र आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडWaterपाणीriverनदीpollutionप्रदूषण