शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडे इच्छुकच कमी

By admin | Updated: August 21, 2014 00:27 IST

विधानसभा निवडणूक : माणमध्ये चार; फलटणमध्ये पाच अर्ज

सातारा : कोरेगाव, वाई, सातारा आणि कऱ्हाड उत्तर या चार विधानसभा मतदारसंघांतून राष्ट्रवादीकडून फक्त विद्यमान आमदारांचेच उमेदवारी मागणी अर्ज आल्याचे बुधवारी रात्री स्पष्ट झाले. माण आणि फलटणमध्ये मात्र मोठी चुरस आहे. येथून अनेकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. पाटणमध्ये पाटणकर पिता-पुत्रांनी अर्ज नेले आहेत.सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, यापैकी आघाडीधर्मानुसार सहा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर दोन काँग्रेसकडे आहेत. मात्र, राष्ट्रवादीने सर्वच मतदारसंघांतून इच्छुक कोण आहे, याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी दि. ११ आॅगस्टपासून राष्ट्रवादी भवनात अर्ज उपलब्ध करून दिले होते. यासाठी अंतिम मुदत दि. २० आॅगस्ट होती.कोरेगाव मतदारसंघातून मंत्री शशिकांत शिंदे, सातारामधून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, वाईतून आ. मकरंद पाटील आणि कऱ्हाड उत्तरमधून आ. बाळासाहेब पाटील यांनीच अर्ज नेले आहेत. रात्री उशिरा हे अर्ज राष्ट्रवादी भवनात देण्यात आले.पाटणमधून आमदार विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांनी उमेदवारी मागणी अर्ज भरले आहेत. त्यांनीही रात्री हे अर्ज राष्ट्रवादी भवनात दिले.दरम्यान, माण आणि फलटणमधून सर्वाधिक मागणी अर्ज आहेत. आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार सदाशिवराव पोळ, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व कविता म्हेत्रे यांनी अर्ज भरले आहेत. फलटणमधून विद्यमान आमदार दीपक चव्हाण, नंदू मोरे, डॉ. सतीश बाबर, सुधीर अहिवळे, बापूराव जगताप यांनी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)आमदार बंधूंची‘कऱ्हाड दक्षिण’मधून मागणीआघाडीधर्मानुसार ‘कऱ्हाड दक्षिण’ची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र, येथून कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू सुभाष पाटील यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीचे पांडुरंग चव्हाण यांनीही येथून शड्डू ठोकला आहे. या दोघांचेही मागणी अर्ज रात्री राष्ट्रवादी भवनात आले.इच्छुकांच्या मंगळवारी मुंबईत मुलाखतीराष्ट्रवादीकडून विधानसभा लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती मुंबई येथे राष्ट्रवादी भवनात होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती मंगळवार, दि. २६ रोजी दुपारी एक वाजता होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.