शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी समर्थकांची चक्क भाजपसोबत आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:31 IST

तारळेत वेगळीच समिकरणे : निवडणुकीकडे पाटण तालुक्याचे लक्ष; १७ जागांसाठी लढत अरुण पवार पाटण : तारळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे ...

तारळेत वेगळीच समिकरणे : निवडणुकीकडे पाटण तालुक्याचे लक्ष; १७ जागांसाठी लढत

अरुण पवार

पाटण : तारळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाची सत्ता मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी म्हणजेच पाटणकर गट आणि भाजप एकत्र आले असल्याचे चित्र याठिकाणी दिसत आहे. एकूण १७ जागांसाठी निवडणूक होत असून, तारळे ग्रामपंचायतीत सत्तांतर होणार की जैसे थे स्थिती राहणार, हे काही दिवसातच स्पष्ट होईल.

तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, १०७ ग्रामपंचायतींपैकी ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आता ७२ ग्रामपंचायतींसाठी लढत होत आहे. त्यापैकी सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या तारळे ग्रामपंचायतीत निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. सध्या या ग्रामपंचायतीवर मंत्री शंभूराज देसाई गटाची सत्ता आहे. तारळे विभाग हा देसाई गटाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. २०११ सालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली होती आणि दहा जागा मिळवल्या होत्या. तर देसाई गटाला पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आत्ताची निवडणूकही देसाई गटाला सोपी राहिलेली नाही.

यावेळच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी गट आणि भाजपच्या रामभाऊ लाहोटी यांच्यात आघाडी झाली आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण १७ जागांपैकी राष्ट्रवादी अकरा जागांवर तर भाजप सहा जागांवर निवडणूक लढवत आहे. तसेच जाधव गल्ली या प्रभागासाठी अपक्ष म्हणून सोमनाथ पाटील हे रिंगणात आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप यांनी केलेल्या आघाडीला ‘नवलाईदेवी तारळे विकास आघाडी’ असे नाव आहे. तर मंत्री देसाई गटाने ‘नवलाईदेवी विकास पॅनेल’ असे नाव दिले आहे. तारळे ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी विकास जाधव, अभिजीत पाटील, राजाभाऊ जाधव, एस. के. वाघडोळे आदी प्रमुख कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. तर परिवर्तन करण्यासाठी विडा उचललेल्या राष्ट्रवादी आणि भाजप आघाडीमध्ये पाटणकर गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सदाभाऊ जाधव, राजेंद्र जाधव, नाना पाटील, अभिजीत जाधव हे कार्यकर्ते झटत आहेत. सध्यातरी तारळे ग्रामपंचायतीची सत्ता मंत्री देसाई गटाच्या हातात आहे. त्यामध्ये १३ देसाई गट तर ४ पाटणकर गट असे बलाबल आहे.

- चौकट

रामभाऊ लाहोटींच्या हालचालींकडे लक्ष

ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीत उतरलेले भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ लाहोटी यांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण तारळे ग्रामपंचायत असो किंवा विभागातील इतर निवडणुका असोत लाहोटी यांचा करिष्मा उठावदार दिसून आला आहे. यापूर्वी मंत्री शंभूराज देसाई यांचे खंदे समर्थक म्हणून रामभाऊ लाहोटी ओळखले जात होते. मात्र, पाच वर्षांपूर्वी मतभेद निर्माण झाल्यामुळे ते देसाई गट सोडून भाजपमध्ये गेले.

- चौकट

महाविकास आघाडीचा फार्म्युला पायदळी

तारळे ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादी समर्थकांनी भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्यात असलेल्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तारळे ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादीकडून पायदळी तुडवण्यात आला असल्याचे दिसते.