शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व, शिवसेनेला जिंकता आली नाही एकही जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 16:39 IST

समान मते, अन् शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव

लोणंद : लोणंद नगरपंचायत निवडणुकीत सताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १७ पैकी १० जागा मिळवत निर्विवाद बहुमत मिळविले असून आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला ३ जागा, भाजपाला ३ जागा तर १ अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. तर, शिवसेनेला एकही जागा मिळाली नसून पून्हा एकदा लोणंदच्या नागरीकांनी शिवसेनेला नाकारले आहे.या निवडणूकीत अपक्ष उमेदवार राजश्री शेळके या एकमेव उपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या. निवडणुकीसाठी सतरा प्रभागासाठी दोन टप्यात मतदान झाले होते. एकुण १६,७४५ मतदारापैकी १२,३२८ म्हणजे ७३.६२% मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता.आज बुधवार दि.19 रोजी लोणंद नगरपंचायत सभागृहात सकाळी 10 वाजता निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजी जगताप व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला. दोन तासात मतमोजणी पूर्ण झाली. या निवडणुकीत माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके – पाटील, खंडाळा तालुका कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. सर्फराज बाळासाहेब बागवान, कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक राजेंद्र डोईफोडे, अॅड. सुभाषराव घाडगे, कुसुम शिरतोडे, विश्वास शिरतोडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर माजी नगराध्यक्ष सचिन शेळके, यांनी काँग्रेसचे अॅड. सर्फराज बागवान यांना पराभूत करुन विजय मिळविला. कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी निकालानंतर लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.समान मते, अन् शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभवप्रभाग क्रमांक ११ मधून शिवसेनेचे विश्वास शिरतोडे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भरत बोडरे यांना ३२७ समान मते पडल्याने चिठ्ठी काढण्यात येऊन राष्ट्रवादीचे भरत बोडरे विजयी म्हणून घोषित करण्यात आले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२NCPराष्ट्रवादी काँग्रेस