नादच खुळा... बैलाच्या वाढदिवशी गौतमी पाटील; जावळीच्या खोऱ्यात कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 04:18 PM2023-03-11T16:18:31+5:302023-03-11T16:19:41+5:30

गौतमीने स्वत: व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

Nadach Khula... Gowtami Patil on Bull's Birthday, Dance in Jawli Valley of satara | नादच खुळा... बैलाच्या वाढदिवशी गौतमी पाटील; जावळीच्या खोऱ्यात कार्यक्रम

नादच खुळा... बैलाच्या वाढदिवशी गौतमी पाटील; जावळीच्या खोऱ्यात कार्यक्रम

googlenewsNext

सातारा - 'सबसे कातील गौतमी पाटील', असं म्हणत दिवसेंदिवस तिचा चाहतावर्ग वाढत आहे. दोन दिवसांपूर्वीच खान्देश कन्या गौतमी पाटीलचा महिला दिनी पिंपरी चिंचवड येथे कार्यक्रम पार पडला. गौतमीच्या या कार्यक्रमाला पुरुषांपेक्षा महिलांचीच गर्दी मोठी होती, त्यामुळे या कार्यक्रमाची वेगळीच चर्चा झाली. गौतमीची फॅन फॉलोविंग वाढत असून तिच्या कार्यक्रमाला राज्यभरातीलअनेक जिल्ह्यांतून मागणी येतेय. आता, चक्क बैलाच्या वाढदिवसानिमित्त एका मालकाने गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

गौतमीने स्वत: व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. महाराष्ट्र चॅंपियन अश्विन बैलाचा वाढदिवस जंगी करण्याचं या बैलाच्या मालकानं ठरवलंय. मग, या सेलिब्रेशनसाठी थेट गौतमी पाटीलचा कार्यक्रमच आयोजित करण्यात आला आहे. गौतमीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली. जावळी तालुक्यातील खर्शी कुडाळ येथे ११ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता गौतमीचा हा कार्यक्रम होत आहे. प्रसिद्ध गाडा मालक पै. सतिश भोसले यांच्या महाराष्ट्र चॅंपियन अश्विन बैलाच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. मी येतेय, तुम्हीही नक्की या.. असं आवाहन गौतमीने चाहत्यांना केलंय. 

गौतमीला मराठी कलाविश्वास संधी

राज्यातील अनेक ठिकाणी स्टेज शो करुन प्रसिद्धी मिळवणारी गौतमी आता थेट मराठी कलाविश्वातही झळकणार आहे. 'बिग बॉस'मराठी फेम उत्कर्ष शिंदे याच्यासोबत गौतमी काम करणार असून उत्कर्षने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. गौतमी लवकरच उत्कर्ष शिंदेच्या नव्या गाण्यात झळकणार आहे. यासाठी दोघांनीही हातमिळवणी केली असून उत्कर्षने याविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.

Web Title: Nadach Khula... Gowtami Patil on Bull's Birthday, Dance in Jawli Valley of satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.