शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

खंडू चव्हाण खूनप्रकरणी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ही दाखल

By admin | Updated: August 27, 2015 22:55 IST

तिघांना पोलीस कोठडी : मारहाणीत मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट

फलटण : ‘आज सहकार क्षेत्राला सरकारकडून वेगळी वागणूक दिली जात आहे. शेतकरी वर्ग संकटात सापडला असून, साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. अशा परिस्थतीत राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना तुम्ही योजना किंवा मंत्रालयांचे नावे बदलण्याचा फंडा करा; पण शेतकऱ्यांच्या पोटाकडेही बघा,’ असा टोला राज्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी लगावला. यावेळी तालुक्यातील विरोधकांनाही रामराजेंनी जोरदार फटकारले.श्रीराम-जवाहर साखर कारखान्यांच्या रोलरपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन भोसले, कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.‘श्रीराम सहकारी साखर कारखाना आजच्या परिस्थितीत स्पर्धेत टिकला पाहिजे. यासाठी कोणत्याही परिस्थितीत या कारखान्याचे गाळप त्वरित व वेळेवर सुरू करण्याचे गरजेचे आहे. तालुक्यात या हंगामात आपल्याबरोबरच इतर तीन त्यामध्ये नवीन दोन खासगी कारखानेही सुरू होणार आहेत. आज एफआरपी एवढा दर देण्यातही अनेक कारखाने अपयशी ठरले आहेत. साखरेचे दर कोसळल्याने व सरकारच्या दुर्लक्षामुळे साखर कारखान्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. चालू हंगामात बरेच कारखाने बंद राहणार असून, कामगारांवरही टांगती तलवार आहे. कारखानदारीची बिकट परिस्थती बघता सरकारी बँका कर्ज देण्यास तयार नाही. ही परिस्थती किती वर्षे राहील, हे सांगता येत नाही. या सर्व आव्हानांचा सामना करीत श्रीराम कारखाना चालवावा लागणार आहे. याचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे,’ असे रामराजेंनी स्पष्ट केले.आज राज्यात व केंद्रात सत्ताबदल झालाय. ज्यावेळी दोन्ही काँग्रेसकडे सत्ता होती, त्यावेळी ज्यादा ऊसदर देता येत नसल्याचे खापर शरद पवारांवर त्यावेळचे विरोधक फोडत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस हंगामाच्या वेळेस तर कारखान्यांच्या विरोधात ऊसदरासाठी आंदोलन करून एवढाच दर पाहिजे, तेवढाच दर पाहिजे, अशा मागण्या करायचे. साखरधंद्याची परिस्थिती व पुढील गणिते त्यांनी जाणून न घेता अवास्तव दर जबरदस्तीने पदरात पाडून घेतल्याने साखर कारखाने अडचणीत आल्याचा आरोप रामराजेंनी करताना आज स्वाभिमानीची लोक सत्तेत आहेत. मात्र, कमी ऊसदर मिळतोय, याविषयी बोलायला व आंदोलन करायला ते तयार नाहीत. निव्वळ शरद पवारांवरील द्वेषापायी व सत्तेसाठी त्यांनी साखर कारखानदारी अडचणीत आणल्याचे रामराजेंनी सांगितले. (प्रतिनिधी) तालुक्यातील विरोधकांनी कामगारात फूट पाडू नयेविरोधकांनी त्यांचा कारखाना चालावा म्हणून श्रीराम कारखान्यातील कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या अंगलट येईल. वेळप्रसंगी तुमच्या कामगारात आम्हाला फूट पाडावी लागेल, असा इशारा विरोधकांना देतानाच विरोधकांचे अस्तित्व राहिलेले नाही. त्यांनाही जनतेच्या प्रश्नावर काही करावयाचे वाटत नाही. स्वत:ची कामे करून घेण्यात ते मश्गुल असल्याचा टोला रामराजेंनी लगावला.शेट्टी-खोत जोडगोळी गप्प का?साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला की साखरधंद्याचा कोणताही अभ्यास न करता एवढा दर पाहिजे, तेवढा दर पाहिजे, अशी दराची अवास्तव मागणी करून कारखानदारांना अडचणीत आणणारे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत ही जोडगळी कमी ऊसदरावर गप्प आहेत. त्यांच्या तोंडातून आता सत्तेवर आल्यावर शरद शब्द फुटेनासा झाला आहे. शरद पवारांवर ठासून आरोप करणारे आज सत्ता आल्यावर मौनव्रत धारण करून बसले आहेत. कोठे गेली आता तुमची गणिते व आकडेवारी, असा सवाल रामराजेंनी केला.