शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात ५९ झाडांच्या प्रत्यारोपणासाठी पालिकेचे प्रयत्न

By प्रगती पाटील | Updated: April 3, 2024 19:30 IST

सातारा : रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या ५९ झाडांपैकी सुयोग्य झाडांचे प्रत्यारोपण करण्याची धडपड सातारा पालिकेने सुरू केली आहे. पहिल्या ...

सातारा : रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या ५९ झाडांपैकी सुयोग्य झाडांचे प्रत्यारोपण करण्याची धडपड सातारा पालिकेने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात यातील पाच झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. ‘हरित सातारा’च्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने उर्वरित झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहेत.सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ ऑफिस चौक या रस्त्यावर पावसाळी पाणी साचत असल्याने हा डांबरी रस्ता वारंवार खराब होतो. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी हा रस्ता आहे. त्यामुळे पालिकेने या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. काँक्रिटीकरण व दोन्ही बाजूला ड्रेनेज या कामासाठी शासनाकडून सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. काँक्रिटीकरण होणारा सातारा शहरातील हा पहिलाच वाहतुकीचा रस्ता आहे. सुमारे ५०० मीटर अंतराचा हा रस्ता आहे. या कामामुळे रस्त्याच्या दुतर्फा ५९ झाडे काढावी लागणार आहेत. झाड तोडण्या ऐवजी त्याचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला. या कामी हरित सातारा ग्रुपने सहकार्याचा हात पुढे केला.

रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या झाडांपैकी पहिल्या टप्प्यात पाच झाडांचे यशस्वी पुनर्रोपण हुतात्मा स्मारक येथे करण्यात आले. टप्प्याटप्प्याने उर्वरित झाडांपैकी सुयोग्य झाडांचे पुनर्रोपण करून ती वाचवण्यात येणार असल्याचे पालिकेचे वृक्ष विभाग प्रमुख, अभियंता सुधीर चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. ही सर्व झाडे हुतात्मा स्मारक परिसर तसेच जुना आरटीओ ऑफिस चौक परिसरात पुनर्स्थापित करण्यात येणार आहेत. 

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या साताऱ्यातील हरित सातारा ग्रुपने या कामी सातारा नगरपालिकेबरोबर सहकार्याचा हात पुढे केला आहे. या ग्रुपचे मार्गदर्शक कन्हैयालाल राजपुरोहित म्हणाले, ‘वर्दळीच्या रस्त्यावरील प्रदूषणाची पातळी कमी करून ऑक्सिजन निर्मिती वाढवण्यासाठी झाडे मदतगार ठरतात. शिवाय विविध जीवांना आश्रय मिळण्याबरोबरच मातीची धूप आणि सुपीकता नियंत्रण हे फायदे होणार आहेत.’ शहरीकरणाच्या लाटेत वृक्षतोड होण्यापासून वाचवणे हा हरित सातारा चा मुख्य विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

५० किलो हळद मीठ अन् ३० किलो बटाटे!हुतात्मा उद्यानात झाडांचे पुर्नरोपण करण्यात आले. ज्या खड्ड्यांमध्ये या झाडांचे रोपण करण्यात आले त्या खड्ड्यात ५० किलो मीठ, ५० किलो हळद, प्रत्येक झाडाला ३० किलो बटाटा या खड्ड्यात टाकण्यात आले होते. 

रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी ही झाडे सुमारे दहा ते पंधरा वर्षांची आहेत. जमिनीपासून १२ फुटांवर झाडाची छाटणी करून झाडाच्या बुंध्याचे पुनरोपण सेंद्रिय पद्धतीने आम्ही करत आहोत. त्याची योग्य निगा राखल्यास नवी पालवी फुटून ही झाडे पुन्हा एकदा नव्या जागेत बहरतील. - श्रीधर थोरात, बिजांकुर फाऊंडेशन

टॅग्स :Satara areaसातारा परिसर