Satara: आईच्या आजारपणाला कंटाळून गळा आवळून खून, मुलाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 13:45 IST2024-02-12T13:44:58+5:302024-02-12T13:45:13+5:30

वडूज : पडळ, ता. खटाव येथील शांताबाई नारायण वाघमारे (वय ९० ) यांच्या डोक्यात विटाने मारहाण करून व दोरीने ...

Mother illness strangled to death in padal satara district, son arrested | Satara: आईच्या आजारपणाला कंटाळून गळा आवळून खून, मुलाला अटक 

Satara: आईच्या आजारपणाला कंटाळून गळा आवळून खून, मुलाला अटक 

वडूज : पडळ, ता. खटाव येथील शांताबाई नारायण वाघमारे (वय ९० ) यांच्या डोक्यात विटाने मारहाण करून व दोरीने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला. हा खून त्यांचा मुलगा अंकुश नारायण वाघमारे ( वय ४५) याने केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असनू, वडूज पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पडळ, ता. खटाव येथील शांताबाई वाघमारे यांना अर्धांगवायूचा आजार होता. त्यांची सतत सेवा करायला लागत होती. तसेच दवाखान्याचा खर्चही वाढत होता. त्यामुळे त्यांचा मुलगा अंकुश वाघमारे याने दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी डोक्यात विटाने मारहाण करून तसेच दोरीने गळा आवळून आईचा खून केला. 

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासांत या खुनाचा छडा लावला. त्यांच्या मुलानेच हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. जन्मदात्या आईचा खून मुलानेच केल्याने वडूज परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने हे करीत आहेत.

Web Title: Mother illness strangled to death in padal satara district, son arrested