शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

तळमावले : कुंभारगाव (ता. पाटण) परिसरात सध्या वारंवार मोबाईल नेटवर्क खंडित होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. कुंभारगावसह ...

तळमावले : कुंभारगाव (ता. पाटण) परिसरात सध्या वारंवार मोबाईल नेटवर्क खंडित होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. कुंभारगावसह मान्याचीवाडी, तळमावले, साईकडे विभाग अनेकदा आऊट ऑफ कव्हरेज होत असल्याने येथील इंटरनेटद्वारे केली जाणारी अनेक कामे खोळंबत आहेत. ढेबेवाडी विभागातील डोंगरी विभाग म्हणून तळमावले परिसराची ओळख आहे. या परिसरातील ग्राहकांना सध्या मोबाईल असूनही वारंवार इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेटअभावी बँकेतील पैसे ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यासह इतर कामे करता येणे मुश्किल बनत आहे.

शंकरराव खोत यांचा पुरस्काराने गौरव

कऱ्हाड : वाजेवाडी (ता. कऱ्हाड) येथील प्रगतशील शेतकरी शंकरराव खोत यांना महिंद्रा समृद्धी इंडिया अ‍ॅग्री अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना परिस्थितीमुळे हा पुरस्कार क्षेत्रीय प्रबंधक अजित बिडकर आणि आशिष गणपुले यांनी खोत यांच्या घरी जाऊन प्रदान केला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व २ लाख ११ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आले पिकात उल्लेखनीय उत्पादन घेतल्याबद्दल खोत यांची या पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली होती.

विंगच्या विद्यालयात आदर्श मातांचा सन्मान

कुसूर : विंग (ता. कऱ्हाड) येथील आदर्श विद्यालयात आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक बी. बी. मोरे, पर्यवेक्षक एस. एस. यादव यांच्या हस्ते जनाबाई डोळे, सुमन आवले आणि स्वाती जाधव यांचा सन्मान करण्यात आला. यू. एस. गलांडे, यू. जे. बिचुकले, दीपाली बामणे, योगेश सनदी, एस. व्ही. सावंत, एन. आर. पाटील, बी. बी. कुंभार, एस. व्ही. जाधव, मनीषा पाटील, डी. जे. निकम, सचिन जाधव, आदी उपस्थित होते.

पिंपरी ते रिसवड रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

मसूर : पिंपरी ते रिसवड रस्त्याची दुरवस्था झाली असून, सदरचा रस्ता गेले अनेक वर्षे दुरुस्त केला नसल्याने दुरवस्थेत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित रस्ता हा शामगाव घाटातून खाली येवून कऱ्हाडला राष्ट्रीय महामार्गाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून बनवण्यात आला होता. मात्र, तो उखडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

येवती ते पाटीलवाडीचा रस्ता बनला धोकादायक

कऱ्हाड : येवती ते पाटीलवाडी या तीन किलोमीटर अंतरावरील मार्गावर सध्या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने ही झाडेझुडपे तोडावीत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. यापूर्वी काही वेळा या झाडाझुडपांमुळे अपघात घडले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.