शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचे कोट्यवधींचे घबाड जप्त

By admin | Updated: June 10, 2016 00:16 IST

वडोलीत ठिय्यावर कारवाई : सत्तर ट्रकसह पोकलॅन, बोटी ताब्यात; ५२ वाफे उद्ध्वस्त

कऱ्हाड : वडोली भिकेश्वर-धनकवडी  (ता. कऱ्हाड) येथील बेकायदा वाळू ठेक्यावर महसूल विभागाने गुरुवारी छापा टाकला. यावेळी वाळू उपसा करणारी कोट्यवधींची यंत्रसामग्री महसूलच्या हाताला लागली असून, वाळूने भरलेले व रिकामे असे सुमारे ७० ट्रकही जप्त करण्यात आले आहेत. यावेळी वाळूचे ५२ वाफेही उद्ध्वस्त करण्यात आले. कृष्णा नदीपात्रात अडकलेल्या ३२ बोटी बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कऱ्हाड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथे बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती यापूर्वी तहसीलदारांना मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी कारवाईही करण्यात आली. त्यावेळी सुमारे ४२ वाफे बंद करण्यात आले होते. त्यानंतर वडोली भिकेश्वरमधील वाळू उपसा थांबेल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही महिन्यांतच येथे ठेकेदारांनी डोके वर काढले. पुन्हा एकदा याठिकाणी बेकायदा वाळू उपसा होऊ लागला. ही माहिती मिळताच गुरुवारी सकाळी महसूल विभागाने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार, नायब तहसीलदार अरुण कदम, यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचताच नदीपात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदारांनी व कामगारांनी पात्रातून धूम ठोकली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यास एकही ठेकेदार व कामगार थांबला नाही. यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार, नायब तहसीलदार अरुण निकम, सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांनी पोलिस बंदोबस्तात कारवाईस सुरुवात केली. वडोली भिकेश्वर येथील सुमारे तीन किलोमीटरच्या अंतरावर गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता. जिल्ह्णातील बड्या वाळू ठेकेदारांनी कब्जेपट्टी घेतली नसताना अनेक महिन्यांपासून राजरोसपणे मोठ्या यंत्रसामुग्रीचा वापर करत वाळू उपसण्यास सुरुवात केली होती.वाळू वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी झाडे ठेकेदारांनी बेकायदेशीररीत्या तोडली असल्याचे कारवाईवेळी निदर्शनास आले. तसेच पोकलॅन, जेसीबी, यांत्रिक बोटी, ट्रक, डंपर यासह इतर साहित्य पाहून अधिकाऱ्यांनाही धडकी भरली. या अनधिकृत ठिय्याची व्याप्ती मोठी असल्याने कारवाईस सुमारे दोन दिवस लागतील, असे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी सांगितले.कोट्यवधींचा माल हस्तगतवडोली भिकेश्वर येथील संबंधित वाळू ठेक्यावरून महसूल विभागाने वाळूने भरलेले २९ ट्रक, रिकामे ४० ट्रक, ५ पोकलॅन मशीन जप्त केल्या आहेत. तसेच वाळू उपशासाठी ठेकेदारांनी ३२ बोटींचा वापर केला आहे.त्यापैकी फक्त पाच बोटी रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्यात यश आले होते. इतर बोटी आज, शुक्रवारी बाहेर काढल्या जाणार आहेत. एकूण ५२ वाफे या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले असून, कोट्यवधींचा माल हस्तगत केला आहे.