शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पांगरखेलच्या विकासासाठी लाखोंचा निधी

By admin | Updated: April 27, 2015 00:12 IST

प्रभावती चव्हाण : सरपंच, ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश

पुसेगाव : पांगरखेल येथील प्रमुख रस्ता, अंतर्गत रस्ता डांबरीकरण, ग्रामपंचायत कार्यालय, विठ्ठल-रुक्मिणी सभागृह व सिमेंट बंधारे व्हावेत, यासाठी सरपंच सुदर्शना जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या विकासकामांसाठी लाखोंचा निधी उपलब्ध करून प्रत्यक्षात कामे मार्गी लावली आहेत,’ असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती प्रभावती चव्हाण यांनी केले. पांगरखेल, ता. खटाव येथे आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पै. सागर साळुंखे, कैलास घाडगे, प्रल्हाद चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र कदम, सरपंच सुदर्शना जगताप, उपसरपंच बाळकृष्ण जगताप, विनोद जगताप, गौरी जगताप, माजी सरपंच दिलीप जगताप, ज्ञानेश्वर जगताप, महेंद्र जगताप, शिवाजी जगताप, अजित जगताप, प्रसाद थोरवे, अधिक जगताप, वामन जगताप, हणमंत जगताप, सुरेश जगताप, तुकाराम जगताप, कैलास जगताप, चंद्रशेखर जगताप, लक्ष्मण जगताप, नितीन जगताप, अमित जगताप, किरण जगताप, रामदास जगताप यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.सभापती चव्हाण म्हणाल्या, ‘आ. शशिकांत शिंदे या विभागाचे लोकप्रतिनिधी होण्याअगोदर येथील मूलभूत प्रश्नांसह अनेक विकासकामे प्रलंबित होती. मात्र, आ. शिंदे या विभागाचे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विकासकामाच्या पर्वाला सुरुवात झाली. विकासकामे करत असताना त्यांनी कधीही राजकीय गटातटाचा अथवा तेथील मतदानाचा विचार न करता केवळ विकास हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गावांमध्ये कोट्यवधींची विकासकामे साधली आहेत.प्रल्हाद चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच सुदर्शना जगताप व उपसरपंच बाळकृष्ण जगताप यांचा सभापती चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)